1नंतर ईयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला,
2“या सर्व गोष्टी मी पूर्वी ऐकल्या आहेत, तुम्ही सर्व वायफळ सांत्वनकर्ते आहात.
3तुमची वायफळ शब्द कधीही संपत नाहीत. तुम्हास काय झाले आहे कि, तुम्ही याप्रमाणे उत्तर देता?
4जर तुमच्यासारखे मलाही बोलता आले असते, तर जे आता तुम्ही म्हणत आहात
5अहो मी तुम्हास माझ्या मुखाने मी धीर दिला असता.
6परंतु मी काहीही बोललो तरी माझ्या यातना कमी होत नाहीत.
7खरोखरच तू माझी शक्ती हिरावून घेतली आहेस. तू माझ्या सर्व कुटुंबाचा नाश केला आहेस.
8तू मला खूप बारीक व अशक्त केले आहे म्हणून मी अपराधी आहे असे लोकांस वाटते.
9देव माझ्यावर हल्ला करतो. तो माझ्यावर रागावला आहे आणि तो माझे शरीर छिन्न विछिन्न करतो. तो माझ्याविरुध्द दात खातो, माझ्या शत्रूचे डोळे माझ्याकडे तिरस्काराने बघतात.
10लोक माझ्या भोवती जमले आहेत. ते माझी थट्टा करतात व तोंडावर मारतात.
11देवाने मला दुष्ट लोकांच्या स्वाधीन केले आहे.
12मी अगदी मजेत होतो, पण देवाने मला चिरडून टाकले.
13त्याचे धनुर्धारी मला घेरतात.
14देव माझ्यावर पुन्हा पुन्हा हल्ला करतो.
15मी फार दु:खी आहे म्हणून मी दु:खाचे कपडे घालतो.
16रडल्यामुळे माझा चेहरा लाल झाला आहे.
17तरीही माझ्या हातून कोणात्याही प्रकारची हिंसा झाली नाही,
18हे धरती, माझे रक्त लपवू नकोस.
19स्वर्गात कदाचित् माझ्या बाजूचा कुणीतरी असेल.
20माझे मित्र माझा उपहास करतात,
21जशी एखादी व्यक्ती आपल्या मित्रासाठी वादविवाद करते