1“माझा आत्मा भंगला+ श्वास संपुष्टात येत आहे* आहे आणि माझे दिवस संपले आहे,
2खात्रीने निंदक माझ्याबरोबर आहेत,
3मला आता शपथ दे, तुझ्यामध्ये तूच मला जामीन हो,
4तू माझ्या मित्रांची मने समजण्यास बंद करून टाकलीस,
5जो आपल्या मित्रांशी धोका करून त्यास लुटीप्रमाणे परक्यांच्या हाती देतो,
6त्याने माझे नाव सर्व लोकांसाठी निंदा असे केले आहे.
7दु:ख आणि यातना यांनी माझे डोळे अंधुक झाले आहेत,
8यामुळे चांगले लोक फार व्यथित झाले आहेत.
9पण चांगली माणसे मात्र न्यायाने जीवन जगत राहतात. ज्याचे हात निर्मळ तो अधिकाधिक सामर्थ्यवान होत जाईल.
10पण तुम्ही सर्व एकत्र या आणि या सगळ्यात माझीच चूक आहे हे मला दाखवून द्या
11माझे आयुष्य संपत चालले आहे. माझ्या योजना धुळीला मिळवल्या गेल्या
12माझे मित्र गोंधळून गेले आहेत. त्यांना रात्र दिवसासारखी वाटते.
13थडगेच माझे नवीन घर असेल अशी मी आशा करतो.
14जर मी गर्तेस म्हणालो तू माझा बाप
15तर आता माझी आशा कोठे आहे?