ईयोब 18:1-20 IRVMar - Bible AI

1नंतर शूहीच्या बिल्ददने उत्तर दिले आणि म्हणाला,

2तू तुझे बोलणे बंद कर! शांत राहा आणि लक्ष दे. आम्हास काही बोलू दे.

3आम्ही पशूसारखे आहोत असे तू का समजतोस,

4रागाने स्वत:स फाडून टाकणाऱ्या,

5खरोखर, “दुष्ट मनुष्याचा प्रकाश नाहीसा होईल.

6त्यांच्या घरातला प्रकाश अंधकारमय होईल. त्यांच्या जवळचा दिवा विझेल.

7त्याची पाऊले पुन्हा दमदारपणे व भरभर पडणार नाहीत. तो हळुहळु चालेल आणि अशक्त बनेल. त्याच्या दुष्ट मसलती त्याचा अध:पात करतील.

8त्याचेच पाय त्यास सापळ्यात अडकवतील.

9सापळा त्याची टाच पकडेल. त्यास घटृ पकडून ठेवेल.

10जमिनीवरची दोरी त्यास जाळ्यात अडकवेल. सापळा त्याची त्याच्या मार्गातच वाट बघत असेल.

11दहशत चोहोबाजूंनी त्याची वाट पाहत आहे.

12वाईट संकटे त्याच्यासाठी भुकेली आहेत.

13भयानक रोग त्याचे अवयव तोडून खाईल.

14त्याच्या घराच्या सुरक्षिततेपासून दूर नेला जाईल.

15जे त्याचे नव्हते ते त्याच्या डेऱ्यात वास करतील

16त्याची खालची मुळे सुकून जातील आणि वरच्या फांद्या मरतील.

17पृथ्वीवरील लोकांस त्याची आठवण राहणार नाही.

18लोक त्यास प्रकाशापासून दूर अंधारात ढकलतील.

19त्यास मुले आणि नातवंडे असणार नाहीत.

20पश्चिमेकडचे लोक जेव्हा या दुष्ट मनुष्याचे काय झाले ते ऐकतील तेव्हा त्यांना धक्का बसेल.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>