1नंतर सोफर नामाथी उत्तर देऊन म्हणाला,
2“माझे विचार मला उत्तर द्यायला भाग पाडत आहेत.
3तुझ्या उत्तरांनी तू आमचा अपमान केला आहेस,
4तुला हे सत्य प्राचीन काळापासुन माहीती आहे,
5दुष्टांचा जयजयकार फार कमी काळासाठी असतो,
6त्याचा माहातम्य गगनाला जाऊन भिडेल,
7परंतु त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा नाश होईल.
8तो एखाद्या स्वप्नासारखाउडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही.
9ज्या लोकांनी त्यास पाहिले होते, त्यांना तो पुन्हा दिसणार नाही.
10दुष्ट मनुष्याने गरीब लोकांकडून जे काही घेतले होते ते त्याची मुले परत करतील.
11तो तरुण होता तेव्हा त्याची हाडे मजबूत होती.
12दुष्टाला वाईट गोष्टी चांगल्या वाटतात.
13दुष्ट मनुष्यास वाईट गोष्टी आवडतात म्हणून तो त्यांना सोडीत नाही.
14परंतु त्या वाईट गोष्टीच त्याच्या पोटात विष होतील.
15त्याने धन गिळले तरी तो ती ओकून टाकील,
16तो फुरशाचे विष चोखील,
17नंतर मधाने आणि दुधाने भरुन वाहाणाऱ्या नद्या
18त्याचा नफा परत करणे भाग पडेल. त्याने जे सुख मिळवण्यासाठी कष्ट केले
19कारण त्याने गरीबांना कष्ट दिले.
20कारण त्यास माहीती आहे त्यास कोणतेच समाधान नसते.
21तो खातो तेव्हा काहीही शिल्लक ठेवीत नाही.
22जेव्हा भरपूर असेल तेव्हा तो संकटानी दबून जाईल.
23दुष्ट मनुष्याने त्यास हवे तितके खाल्ल्यानंतर देव त्याचा क्रोधाग्नी त्याच्यावर फेकेल.
24दुष्ट मनुष्य तलवारीला भिऊन पळून जाण्याचा प्रयत्न करेल.
25पितळी बाण त्याच्या शरीरातून आरपार जाईल.
26त्याच्या खजिन्यावर पूर्ण कोळोख येईल.
27आकाश त्याचा अधर्म प्रकट करील,
28पुराने त्याच्या घरातील संपत्ती नष्ट होईल,