1नंतर ईयोब ने आपले बोलणे पुढे चालू ठेवले आणि म्हणाला,
2“जसे देव जिवंत आहे, तो माझ्याबाबतीत अन्यायी होता,
3जोपर्यंत माझ्यात जीव आहे
4माझे ओठ वाईट गोष्टी बोलणार नाहीत
5तुम्ही बरोबर आहात हेही मी कधी मान्य करणार नाही.
6मी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांना मी चिकटून राहीन.
7माझे शत्रू दुष्टासारखे होवो,
8कारण देवविरहीत राहणाऱ्यांना देव जीवनातून छेदतो तर त्यांची काय आशा आहे,
9देव त्याची आरोळी ऐकेल काय?
10तो सर्वशक्तिमानाच्या ठायी आनंद मानेल काय?
11मी तुम्हास देवाच्या हाताविषयी शिकविल,
12पाहा, तुम्ही सर्वांनी हे पाहिले आहे,
13देवाने वाईट लोकांसाठी हीच योजना आखली होती.
14त्यास खूप मुले असतील परंतु त्याची मुले तलवारीने मरतील,
15राहीलेली सर्व मुले साथीने मरतील,
16दुष्ट मनुष्यास इतकी चांदी मिळेल की ती त्यास मातीमोल वाटेल, त्यास इतके कपडे मिळतील की ते त्यास मातीच्या ढिगाप्रमाणे वाटतील.
17जरी तो कपडे करील ते धार्मिक अंगावर घालतील,
18तो त्याचे घर कोळ्यासारखे बांधतो,
19तो श्रीमंत स्थितीत अंग टाकतो,
20भय त्यास पाण्याप्रमाणे घेवून जाईल,
21पूर्वेचा वारा त्यास वाहून नेईल आणि तो जाईल
22तो वारा+ देव* त्यास फेकून देईल आणि थांबणार नाही,