1“खरोखर चांदी मिळते अशा खाणी आहेत,
2जमिनीतून लोखंड काढतात,
3मनुष्य अंधाराचे निवारण करतो,
4लोकांच्या राहण्याच्या जागेपासून तो दूर खाण खणतो,
5जसे जमिनीकडे पाहा, तिच्यातून आपणास अन्न मिळते,
6जमिनीच्या खालचे पाषाण म्हणजे जेथे नीलमणी मिळतात,
7पक्ष्यांना त्या वाटांविषयी काही माहिती नसते,
8रानटी जनावरे त्या वाटांवरुन गेलेली नसतात,
9मनुष्य कठीण खडकावर हात टाकतो,
10ते खडकातून बोगदा खणतात,
11ते पाण्याचे प्रवाह बंद करतात म्हणजे त्यातून पाणि बाहेर पडत नाही,
12पण मनुष्यास शहाणपण कुठे मिळेल?
13शहाणपण किती मोलाचे आहे हे मनुष्याला कळत नाही,
14पृथ्वीवरील मोठे खोल जलाशय असे म्हणते, ‘माझ्यामध्ये ते नाही.’
15तुम्ही सोने देऊन ते विकत घेऊ शकत नाही,
16तुम्ही ओफीरच्या सोन्याने किंवा मौल्यवान गोमेद
17शहाणपण सोन्यापेक्षा किंवा स्फटिकापेक्षा मौल्यवान असते,
18शहाणपण पोवळ्यापेक्षा व स्फटिकापेक्षाही मौल्यवान आहे,
19इथिओपियातील (कूश) पीतमणी त्याच्या बरोबरीचा नाही,
20मग शहाणपणा कुठून येते?
21पृथ्वीवरील सर्व जिवंत प्राण्यापासून शहाणपण लपवून ठेवले आहे,
22मृत्यू आणि विनाश म्हणतात, ‘आम्हास शहाणपण सापडले नाही,
23फक्त देवालाच शहाणपणाकडे नेणारा मार्ग माहीत आहे,
24देवाला पृथ्वीचे अगदी शेवटचे टोकसुध्दा दिसू शकते,
25देवाने वाऱ्याला त्यांची शक्ती दिली,
26पावसास कोठे पाठवायचे ते त्यानेच ठरवले
27तेव्हा देवाला शहाणपण दिसले आणि त्याने त्याचा विचार केला,