ईयोब 3:1-25 IRVMar - Bible AI

1यानंतर, ईयोबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसास शाप दिला.

2तो (ईयोब) म्हणाला,

3“मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस नष्ट होवो,

4तो दिवस अंधकारमय होवो,

5मृत्यूची सावली आणि अंधार त्यास आपल्या स्वतःचा समजो,

6ती रात्र काळोख घट्ट पकडून ठेवो, वर्षाच्या दिवसांमध्ये ती आनंद न पावो.

7पाहा, ती रात्र फलीत न होवो,

8जे लिव्याथानाला जागविण्यात निपुण आहेत

9त्या दिवसाच्या पहाटेचे तारे काळे होत.

10कारण तिने माझ्या जननीचे ऊदरद्वार बंद केले नाही,

11उदरातुन बाहेर आलो तेव्हाच मी का मरण पावलो नाही? माझ्या आईने मला जन्म देताच मी का प्राण त्यागला नाही?

12तिच्या मांडयानी माझा स्विकार का केला?

13तर मी आता निश्चिंत खाली पडून राहीलो असतो,

14पृथ्वीवरील राजे आणि सल्लागार,

15किंवा ज्या राजकुमारांनी आपली घरे सोन्या रुप्यांनी भरली त्यांच्या बरोबरच मलाही मरण आले असते तर बरे झाले असते.

16कदाचित मी जन्मापासूनच मृत मूल का झालो नाही, किंवा

17तेथे गेल्यानंतरच दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात.

18तेथे कैदीही सहज एकत्र राहतात,

19लहान आणि थोर तेथे आहेत,

20दुर्दशेतील लोकांस प्रकाश का दिल्या जातो,

21ज्याला मरण पाहीजे त्यास मरण येत नाही,

22त्यास थडगे प्राप्त झाले म्हणजे ते हर्षीत होतात, त्यास अति आनंद होतो?

23ज्या पुरूषाचा मार्ग लपलेला आहे, देवाने ज्या पुरुषाला कुपंणात ठेवले आहे अशाला प्रकाश का मिळतो?

24मला जेवणाऐवजी उसासे मिळत आहेत!

25ज्या गोष्टींना मी घाबरतो त्याच गोष्टी माझ्यावर येतात. मी ज्याला भ्यालो तेच माझ्यावर आले.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
v>