ईयोब 32:1-21 IRVMar - Bible AI

1नंतर या तीन मनुष्यांनी ईयोबाला उत्तर देण्याचे थांबविले, कारण तो त्याच्या स्वतःच्या नजरेमध्ये नितीमान होता.

2नंतर राम घराण्यातील बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याचा राग भडकला, देवापेक्षा स्वतःला निर्दोष ठरविल्याबद्दल ईयोबावर त्याचा राग भडकला.

3अलीहूचा राग आणखी त्याच्या तीनही मित्रावर भडकला कारण ईयोबासाठी त्यांना कोणतेही उत्तर सापडले नाही, आणि तरीही ते ईयोबाला दोष देत राहीले होते.

4दुसरे लोक त्याच्यापेक्षा वयाने मोठे असल्या कारणाने अलीहूने ईयोबास बोलण्यास वाट पाहिली.

5तथापि, जेव्हा अलीहूने बघीतले कि, त्या तीन पुरूषांकडे काहीही उत्तर नाही हे पाहून, त्याचा राग भडकला.

6मग बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याने उत्तर दिले, तो म्हणाला,

7मी म्हणालो, जास्त दिवस पाहिलेल्यांनी बोलले पाहीजे,

8परंतु देवाचा आत्मा मनुष्यात असतो,

9मनुष्य महान असला म्हणजेच तो ज्ञानी असतो असे नाही,

10त्या कारणामुळे मी तुम्हास म्हणतो, माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या,

11पाहा, मी तुमच्या शब्दांची वाट पाहीली,

12खरे पाहता, मी तुझ्याकडे लक्ष लावले,

13संभाळा, आम्हास ज्ञान सापडले असे म्हणण्यास धजू नको!

14ईयोबाने त्याचे शब्द माझ्या विरोधात वापरले नाहीत,

15हे तीनही माणसे मुके झाले आहेत, आता ते ईयोबाला उत्तर देऊ शकत नाहीत.

16ते बोलत नाहीत म्हणून मी वाट पाहावी काय?

17नाही, मी माझ्या बाजूने उत्तर देईल,

18माझ्याजवळ पुष्कळ शब्द आहेत,

19पाहा, माझे मन बंद करून ठेवलेल्या द्राक्षरसाप्रमाणे झाले आहे,

20मी बोललो तर मला बरे वाटेल,

21मी कोणाची बाजू घेणार नाही,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>