ईयोब 35:1-15 IRVMar - Bible AI

1अलीहूने आपले बोलणे चालू ठेवले. तो म्हणाला,

2“तू निष्पाप आहे असा तू विचार करतोस काय?

3तू देवाला विचारतोस ‘जर मी नितीमान असण्याचा मला काय लाभ मिळेल?

4मी तुला उत्तर देतो,

5वरती आकाशाकडे बघ,

6जर तू पाप केलेस तर त्यामुळे देवाला कसली इजा होत नाही?

7आणि तू खूप नितीमान असलास तरी तू देवाला काही देऊ शकत नाहीस?

8तुझे दुष्टपण कदाचित मनुष्यास ईजा पोहचवेल, जसा तू मनुष्य आहेस,

9पुष्कळशा वाईट कृत्यामुळे लोकांस दु:ख झाले तर ते ओरडतील.

10परंतु कोणीही असे म्हणणार नाहीत, मला निर्माण करणारा देव कुठे आहे?

11‘देवाने आम्हास आकाशातील पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे तेव्हा तो कुठे आहे?’

12त्यामुळे त्यांनी देवाकडे मदत मागितली तरी देव त्यांना उत्तर देणार नाही

13देव त्यांच्या तुच्छ याचनेकडे लक्ष देणार नाही

14तेव्हा, तू जेव्हा असे म्हणशील की देव तुला दिसत नाही तेव्हा देव तुझ्याकडे लक्ष देणार नाही

15तो तुला किती थोडक्यात उत्तर देईल जर तू असे म्हणालास तो क्रोधाने कोणालाही शिक्षा करीत नाही,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>