ईयोब 39:1-29 IRVMar - Bible AI

1रानशेळी कधी व्यायतात ते तुला माहीत आहे का?

2पहाडी बकरी आणि हरीणी किती महिने आपल्या पिलांना पोटात वाढवतात ते तुला माहीत आहे का?

3ते प्राणी लोळतात प्रसूतिवेदना सहन करतात

4ती बछडी शेतात मोठी होतात.

5रानटी गाढवांना कोणी सोडून दिले?

6ज्याला मी वाळवंटात घर दिले,

7गजबजलेल्या शहरांना हसतात (त्याला शहरातला गजबजाट आवडत नाही)

8ते डोंगरात राहतात तेच त्यांचे कुरण आहे.

9रानटी बैल तुझी सेवा करायला तयार होईल का?

10दोरीने तुला रानटी बैलाला ताब्यात करता येईल काय?

11तो खूप बलवान असतो त्याच्यावर तू भरवसा ठेवशील काय,

12तो तुझे धान्य शेतातून गोळा करेल

13“शहामृगी आपले पंख आनंदाने फडफडवते

14ती आपली अंडी जमिनीत घालते

15आपल्या अंड्यांवरुन कोणी चालत जाईल किंवा रानटी प्राणी ती फोडतील हे ती विसरते.

16ती आपल्या पिलांना सोडून जाते ती जणू स्वत:ची नाहीतच असे ती वागते.

17कारण मी देवाने तिला शहाणे केले नाही. आणि मीच तिला समज दिली नाही.

18परंतु ती जेव्हा पळण्यासाठी उठते

19तू घोड्याला त्याची शक्ती दिलीस का?

20तू त्यास टोळाप्रमाणे लांब उडी मारायला सांगितलेस का?

21तो बलवान आहे म्हणून आनंदात असतो.

22तो भीतीला हसतो, तो कशालाही भीत नाही

23सैनिकाचा भाता त्याच्या बाजूला हलत असतो

24तो फार अनावर होतो. तो जमिनीवर जोरात धावतो

25रणशिंग ऐकू येते तेव्हा घोडा घाई करतो.

26तू ज्ञानाने तू ससाण्याला पंख पसरुन

27आकाशात गरुडाला उंच उडायला शिकवणारा तूच का?

28तो उंच सुळक्यावर राहतो

29त्याच्या तटबंदीवरुन आपले भक्ष्य शोधतो.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>