1अलीफज तेमानीने उत्तर दिले आणि तो म्हणाला,
2“जर कोणी तुझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, तर तू दु:खी होशील का? परंतू बोलण्यापासून स्वत:ला कोण आवरेल?
3पाहा, तू पुष्कळांना शिकवले आहेस.
4तू तुझ्या शब्दांनी खाली पडणाऱ्यांना सावरले आहेस.
5पण आता संकटे तुझ्यावर आली आहेत, आणि तू खचला आहेस,
6तुझ्या देवभिरूपणाची तुला खात्री नाही काय, तुझी सात्वीकत्ता तुझ्या आशेचे मार्ग नाही काय?
7मी तुला विंनती करतो, कोणी निष्पाप कधी नाश पावला का?
8मी असे पाहीले आहे की जे घोर अन्यायाची नांगरणी करीतात, आणि कष्ट पेरतात ते तशीच कापणी करतात.
9देवाच्या श्वासाने ते नाश पावतात.
10सिंहाची गर्जना, सिंहाचा विक्राळ ध्वनी नष्ट होतो,
11म्हातारा सिंह शिकार न मिळाल्यामुळे मरण पावतो, सिंहिणीचे छावे सगळीकडे पांगतात
12आता माझ्याकडे एक गुप्त निरोप आला,
13जेव्हा लोक गाढ झोपेत असतात, मी रात्रीच्या दृष्टांताच्या विचारात असतो,
14मी घाबरलो आणि माझा थरकाप झाला.
15एक आत्मा अगदी माझ्या चेहऱ्याजवळून गेला आणि
16तो आत्मा निश्चल उभा राहिला, पण त्याचा आकार मला दिसू शकला नाही,
17मर्त्य मनुष्य देवापेक्षा नितीमान असू शकतो काय?
18पाहा, जर देव त्याच्या सेवकावर विश्वास ठेवत नाही.
19तर जे मातीच्या घरात राहतात त्यांच्याविषयी हे किती सत्य आहे,
20आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते नाश पावतात, ते कायमचे नष्ट होतात व कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही.