ईयोब 41:1-33 IRVMar - Bible AI

1तुला लिव्याथानाला + मोठा जलप्राणी*गळ टाकून पकडता येईल का?

2तुला लिव्याथानाच्या नाकातून दोरी घालून त्यास वेसण घालता येईल का?

3लिव्याथान तुझ्याकडे सोडून देण्यासाठी याचना करील का?

4लिव्याथान तुझ्याशी करार करून

5तू पक्ष्याशी जसा खेळशील तसा लिव्याथानाशी खेळशील का?

6मच्छीमार तुझ्याकडून लिव्याथानाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील का?

7तू लिव्याथानाच्या कातडीत

8तू एकदा का लिव्याथानावर हात टाकलास तर पुन्हा तसे कधी करु शकणार नाहीस.

9तू लिव्याथानाचा पराभव करु शकशील असे तुला वाटत असेल तर ते विसरून जा.

10एकही मनुष्य त्यास जागे करून त्याचा राग ओढवून घेण्याइतका शूर नाही.

11मला कोणी काही प्रथम दिले नाही म्हणून मी त्यांची परत फेड करू?

12मी तुला लिव्याथानाच्या पायांविषयी,

13कोणीही त्याची कातडी छेदू शकत नाही.

14लिव्याथानाला त्याचा जबडा उघडायला कोणीही भाग पाडू शकत नाही.

15लिव्याथानाच्या पाठीवर ढालीसारख्या

16ते खवले एकमेकांना इतके चिकटले आहेत की

17त्याचे खवले एकमेकांशी घटृ बांधलेले आहेत.

18लिव्याथान जेव्हा शिंकतो तेव्हा वीज चमकल्यासारखी वाटते.

19त्याच्या तोंडातून आगीचे लोळ बाहेर पडतात.

20उकळत्या भांड्याखाली ठेवलेल्या जळत्या लव्हाळ्यातून निघतो

21लिव्याथानाच्या श्वासांनी कोळसे पेटतात आणि त्याच्या तोंडातून ज्वाला बाहेर पडतात.

22लिव्याथानाची मान मजबूत आहे.

23त्याच्या कातडीवर एकही मऊ भाग नाही

24लिव्याथानाचे हृदय पाषाणासारखे आहे.

25लिव्याथान उठून उभा राहिला की शूर वीरही घाबरतात

26तलवारी, भाले आणि तीर त्याच्यावर फेकले तरी ते त्यास न लागता परत येतात.

27तो लोखाडास गवताच्या काडीसारखे मोडू शकतो

28तो बाणांना घाबरुन पळून जात नाही

29जेव्हा लाकडी गदा त्याच्यावर आपटली जाते तेव्हा त्यास ते गवत आपटल्याप्रमाणे वाटते.

30लिव्याथानाच्या शरीरावरची कातडी तीक्ष्ण, टणक खापरासाखी आहे.

31लिव्याथान पाण्याला उकळी आल्याप्रमाणे हलवतो.

32लिव्याथान पोहतो तेव्हा तो आपल्यामागे मार्ग तयार करतो.

33पृथ्वीवरचा एकही पशू लिव्याथानासारखा नाही.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>