उत्पत्ती 49:1-32 IRVMar - Bible AI

1त्यानंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले, तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्याजवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल, ते मी तुम्हास सांगतो.”

2“याकोबाच्या मुलांनो, तुम्ही सर्व एकत्र या आणि ऐका,

3रऊबेना, तू माझा पहिलाच म्हणजे थोरला मुलगा आहेस. पुरुष म्हणून माझ्यात असलेल्या शक्तीचा तू पहिला पुरावा आहेस,

4परंतु तुझ्या भावना पुराच्या पाण्याच्या अनावर व चंचल लाटांप्रमाणे आहेत.

5“शिमोन व लेवी हे सख्खे भाऊ आहेत.

6माझ्या जिवा, त्यांच्या गुप्त मसलतींमध्ये गुंतू नको;

7त्यांचा राग शाप आहे, ते अति रागाने वेडे होतात.

8यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील.

9यहूदा सिंहाचा छावा आहे.

10शिलो येईपर्यंत यहूदाकडून राजवेत्र जाणार नाही,

11तो त्याचा तरुण घोडा द्राक्षवेलीस,

12त्याचे डोळे द्राक्षरसापेक्षा अधिक लालबुंद होतील.

13जबुलून समुद्र किनाऱ्याजवळ राहिल. तो जहाजासाठी सुरक्षित बंदर होईल.

14“इस्साखार बळकट गाढव आहे. तो मेंढवाड्यांच्यामध्ये + मेंढ्यांच्या दोन समूहाच्या मध्ये *दबून बसला आहे.

15आपले विसावा घेण्याचे ठिकाण चांगले आहे,

16इस्राएलाचा एक वंश या नात्याने दान आपल्या लोकांचा न्याय करील.

17तो रस्त्याच्या कडेला असणाऱ्या सापाप्रमाणे,

18हे परमेश्वरा, तुझ्याकडून उद्धार होण्याची मी वाट पाहत आहे.

19गाद-लुटारूंची टोळी त्याच्यावर हल्ला करेल,

20आशेराचे अन्न समृद्ध होईल आणि तो राजाला योग्य असे शाही अन्नपदार्थ पुरवील.

21नफताली मोकळ्या सुटलेल्या हरीणीप्रमाणे आहे.

22योसेफ हा फलदायी फाट्यासारखा आहे.

23तिरंदाजांनी त्याच्यावर हल्ला केला.

24तरी त्याचे धनुष्य मजबूत राहील,

25कारण तुझ्या बापाचा देव, जो तुला मदत करील,

26तुझ्या बापाचे आशीर्वाद माझ्या पूर्वजांच्या आशीर्वादापेक्षा मोठे होतील,

27बन्यामीन हा भुकेला लांडगा आहे. तो सकाळी आपले भक्ष्य मारून खाईल, आणि संध्याकाळी तो लूट वाटून घेईल.”

28हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत. त्यांच्या वडिलाने आशीर्वाद देऊन त्यांना म्हटले ते हेच. त्याने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आशीर्वाद दिला.

29मग त्याने त्यांना आज्ञा दिली आणि त्यांना म्हणाला, “मी आता माझ्या लोकांकडे जात आहे. एफ्रोन हित्ती ह्याच्या शेतातील गुहेत माझ्या पूर्वजांबरोबर मला पुरावे,

30ती गुहा कनान देशात मम्रेजवळील मकपेलाच्या शेतात आहे, आपल्या घराण्याला पुरण्याची जागा असावी म्हणून अब्राहामाने ते शेत एफ्रोन हित्ती याच्याकडून विकत घेतले.

31अब्राहाम व त्याची पत्नी सारा, यांना त्या गुहेत पुरले आहे; इसहाक आणि त्याची पत्नी रिबका यांनाही तेथेच पुरले आहे; आणि माझी पत्नी लेआ हिलाही मी तेथेच पुरले आहे.

32ते शेत व ती गुहा हेथी लोकांकडून विकत घेतलेली आहे.”

>