उपदेशक 1:1-17 IRVMar - Bible AI

1ही शिक्षकाकडून आलेली वचने आहेत, जो यरूशलेमेतील राजा आणि दावीदाचा वंशज होता.

2शिक्षक हे म्हणतो,

3भूतलावर मानवजात जे सर्व कष्ट करते त्यापासून त्यास काय लाभ?

4एक पिढी जाते,

5सूर्य उगवतो

6वारा दक्षिणेकडे वाहतो

7सर्व नद्या सागरात जाऊन मिळतात

8सर्व गोष्टी कष्टमय आहेत.

9जे काही आहे तेच होणार,

10कोणतीही अशी गोष्ट आहे का ज्याविषयी असे म्हणता येईल,

11प्राचीन काळी घडलेल्या गोष्टी कोणाच्या लक्षात राहत नाहीत.

12मी शिक्षक आहे, आणि यरूशलेमेमध्ये इस्राएलावर राजा होतो.

13आकाशाखाली जे सर्वकाही करतात त्याचा मी ज्ञानाने अभ्यास केला आणि त्यांचा शोध घेण्याकडे मी आपले चित्त लावले. देवाने मनुष्यांच्या पुत्रामागे त्याचा शोध घेण्याचे बिकट कष्ट लावून दिले आहेत.

14भूतलावर जी काही कामे चालतात ती मी पाहिली आणि पाहा, ते सर्व वायफळ आहेत आणि वाऱ्याचा पाठलाग करण्यासारखे ते आहे.

15जे वाकडे आहे ते सरळ करू शकत नाही!

16मी आपल्या मनाशीच बोलून म्हणालो, “पाहा, माझ्या आधी ज्या राजांनी यरूशलेमेवर राज्य केले त्या सर्वांपेक्षा मी अधिक ज्ञान प्राप्त करून घेतले आहे. माझ्या मनाने महान ज्ञान व विद्या यांचा अनुभव घेतला आहे.”

17याकरिता ज्ञान समजायला आणि वेडेपण व मूर्खपण जाणायला मी आपले मन लावले, मग हेही वाऱ्याचा पाठलाग करण्यासारखे आहे असे मी समजलो.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
div>