गणना 28:1-30 IRVMar - Bible AI

1परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला,

2इस्राएल लोकांस आज्ञा दे आणि त्यांना सांग की, माझे अर्पण, म्हणजे मला मधुर सुवासाची अग्नीतून केलेली माझी अर्पणे यासाठी माझे अन्न, तुम्ही त्यांच्या नेमलेल्या वेळी अर्पणे करण्यास जपा.

3आणखी तू त्यांना सांग, अग्नीतून केलेले अर्पण त्यांनी परमेश्वरास अर्पावे ते हे आहेः त्यांनी नेहमी होमार्पणासाठी रोज एक एक वर्षाची दोन निर्दोष नर कोकरे.

4एक कोकरू सकाळी आणि दुसरे संध्याकाळी अर्पण करावे.

5हातकुटीच्या पाव हिन+ साधारण एक लिटर* तेलात मळलेल्या एक दशमांश एफा सपिठाचे+ साधारण एक किलोग्राम* अन्नार्पण करावे.

6हे नित्याचे होमार्पण, सीनाय पर्वतावर नेमलेले, परमेश्वरास सुवासासाठी अग्नीतून केलेले असे अर्पण आहे.

7त्याबरोबरचे पेयार्पण एका कोकरामागे पाव हिन असावे, म्हणजे परमेश्वरासाठी पवित्रस्थानी मदिरेचे पेयार्पण तू ओतावे.

8दुसरे कोकरू संध्याकाळी अर्पावे. जसे सकाळचे अन्नार्पणाप्रमाणे व त्याबरोबरची पेयार्पणे तसे ते परमेश्वरास मधुर सुवासाचे, अग्नीतून केलेले अर्पण असे अर्पण कर.

9“प्रत्येक शब्बाथ दिवशी एक एक वर्षाचे दोन निर्दोष नर कोकरे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ व त्याबरोबरची पेयार्पण ही अर्पावी.

10नेहमीचे होमार्पण व त्याबरोबरचे पेयार्पण याखेरीज आणखी हा होमार्पण प्रत्येक शब्बाथ दिवशी अर्पावा.”

11प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही परमेश्वरास होमार्पणे करावे. या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाच्या सात मेंढ्या असतील. त्या मेंढ्या दोषरहित असाव्यात.

12प्रत्येक बैलामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले तीन दशमांश एफा सपीठ आणि प्रत्येक मेंढ्यामागे अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले दोन दशमांश एफा सपीठ.

13आणि प्रत्येक कोकराबरोबर अन्नार्पण म्हणून तेलात मळलेले एक दशमांश एफा सपीठ अर्पावे. हे होमार्पण, मधुर सुवासाचे परमेश्वरास अग्नीतून केलेले अर्पण असे आहे.

14लोकांची पेयार्पणे ही प्रत्येक बैलाकरता अर्धा हीन, व प्रत्येक मेंढ्याकरता एकतृतीयांश हीन व प्रत्येक कोकऱ्याकरता एक चतुर्थाश हीन इतका द्राक्षरस असावा, वर्षातील प्रत्येक महिन्यात हे होमार्पण करावे.

15आणि निरंतरचे होमार्पण व त्याचे पेयार्पण याखेरीज परमेश्वरास पापार्पणासाठी शेरडातला एक बकरा अर्पावा.

16परमेश्वराचा वल्हांडण सण महिन्याच्या चौदाव्या दिवशी आहे.

17बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या पंधराव्या दिवशी सुरु होतो. हा सण सात दिवस असेल. खमीराशिवाय केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता.

18या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही खास सभा बोलावली पाहिजे. त्यादिवशी तुम्ही कसलेही काम करायचे नाही.

19तुम्ही परमेश्वरास होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, एक मेंढा आणि एक वर्षाची सात कोकरे असतील. ती दोषरहित असावीत.

20त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. गोऱ्ह्यामागे तीन दशमांस एफा आणि त्या मेंढ्याच्यामागे दोन दशमांस एफा,

21आणि सात कोकरापैकी प्रत्येक कोकरामागे एक दशमांश एफा अर्पावे.

22तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. तुम्हास शुद्ध करण्यासाठी देण्यात येणारे ते पापार्पण असेल.

23सकाळचे होमार्पण जे निरंतरचे होमार्पण आहे त्याव्यतिरिक्त हे अर्पण करावे.

24याप्रमाणे वल्हाडणाचे सात दिवस दररोज परमेश्वरास मधुर सुवासाचे, अग्नीतून केलेल्या अर्पणाचे अन्न अर्पण करा, निरंतरचे होमार्पणे आणि त्याचे पेयार्पण याव्यतिरिक्त हे अर्पण असावे.

25नंतर या सणाच्या सातव्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा आणि तुम्ही त्यादिवशी काहीही अंगमेहनीतीचे काम करू नये.

26सप्ताहांच्या सणात प्रथम पीक अर्पिण्याच्या दिवशी तुम्ही परमेश्वरास नव्या अन्नाचे अर्पण कराल त्यावेळी तुम्ही एक पवित्र मेळा बोलवा त्यादिवशी तुम्ही कसलेही अंगमेहनीतीचे काम करू नये.

27तुम्ही परमेश्वरास सुवासासाठी होमार्पणे म्हणून तुम्ही दोन गोऱ्हे, एक मेंढा व एक एक वर्षाचे सात कोकरे अर्पण करा.

28आणि त्याबरोबरचे अन्नार्पण तेलात मळलेल्या सपिठाचे असावे. प्रत्येक गोऱ्ह्यामागे तीन दशमांश एफा व मेंढ्यामागे दोन दशमांश एफा द्यावे.

29व त्या सात कोकराबरोबर एक दशमांश एफा सपीठ अर्पावे.

30आणि तुम्हासाठी प्रायश्चित करायला एक बकरा अर्पावा.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>