जखर्‍या 1:1-20 IRVMar - Bible AI

1पारसाचा राजा दारयावेश+ राजा दरयावेश हा दरयावेश हिस्तास्पेस होता, ज्याने पारसावर इ. स. पूर्व 522-486 या काळात राज्य केले. परसाच्या भाषेत त्याचे नाव दारा असे होते. * याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या आठव्या महिन्यात, जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा, त्यास परमेश्वराकडून वचन प्राप्त झाले ते असे,

2परमेश्वर तुमच्या पूर्वजांवर फार रागावला होता.

3तर त्यांना असे सांग, सैन्यांचा परमेश्वर असे म्हणतो:

4संदेष्टे तुमच्या पूर्वजांना पूर्वी संदेश देत म्हणाले, “सैन्याचा देव असे म्हणतो: आपल्या दुष्ट मार्गांपासून आणि वाईट चालीरितींपासून वळा!” परंतु त्यांनी ऐकले नाही आणि माझ्याकडे लक्ष दिले नाही. त्या पूर्वजांसारखे होऊ नका. ही परमेश्वराची वाणी होय.

5“तुमचे पूर्वज, कोठे आहेत? आणि संदेष्टे देखील सर्वकाळाकरता येथे राहतील काय?

6परंतु मी माझ्या ज्या वचनांनी आणि माझ्या ज्या नियमांनी माझे दास, जे माझे संदेष्टे त्यांना आज्ञापिले,

7दारयावेश ह्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षाच्या अकराव्या म्हणजे शबाट महिन्याच्या चोविसाव्या दिवशी जखऱ्या, जो बरेख्याचा मुलगा, जो इद्दोचा मुलगा याला, परमेश्वराचा संदेश प्राप्त झाला तो असा:

8“रात्र असतांना मला दृष्टांतात दिसले ते असे: तांबड्या घोड्यावर आरुढ झालेला एक मनुष्य मी पाहिला आणि तो दरीतल्या मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा होता. त्याच्यामागे तांबड्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे घोडे होते.”

9मी विचारले, “प्रभू, हे कोण आहेत?” तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत मला म्हणाला, “हे कोण आहेत ते मी तुला दाखवतो.”

10मग मेंदीच्या झुडुपांमध्ये उभा असलेल्या मनुष्याने उत्तर दिले व म्हणाला, “पृथ्वीवर इकडे तिकडे संचार करायला परमेश्वराने हे पाठवले आहेत.”

11नंतर त्यांनी मेंदीच्या झुडुपांत उभ्या असलेल्या परमेश्वराच्या दिव्यदूताला उत्तर दिले व ते म्हणाले, “आम्ही पृथ्वीवर इकडे तिकडे फिरलो आणि पाहा संपूर्ण पृथ्वी शांत व विसावली आहे.”

12मग परमेश्वराच्या दिव्यदूताने उत्तर देऊन म्हटले, “हे सेनाधीश परमेश्वरा, या सत्तर वर्षांपासून यरूशलेमेचे आणि यहूदातील नगरांनी जो क्रोध सहन केला आहे त्याविषयी आणखी किती काळ तू करूणा करणार नाहीस?”

13माझ्याशी बोलत असलेल्या परमेश्वराच्या देवदूताला परमेश्वर चांगल्या शब्दांत व सांत्वन देणाऱ्या शब्दांत बोलला.

14मग माझ्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचा दूत मला म्हणाला, “घोषणा करून सांग की, ‘सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो:

15आणि स्वस्थ बसलेल्या राष्ट्रांवर माझा राग पेटला आहे;

16म्हणून परमेश्वर असे म्हणतो, “मी यरूशलेमेकडे करुणामय होऊन परत फिरलो आहे. माझे निवासस्थान तिच्यात पुन्हा बांधले जाईल.”

17पुन्हा पुकार आणि असे सांग, “सेनाधीश परमेश्वर म्हणतो: ‘माझी नगरे पुन्हा एकदा चांगूलपणाने भरभरून वाहतील,

18मग मी माझे डोळे वर करून पाहिले आणि मला चार शिंगे दिसली!

19माझ्याशी बोलत असलेल्या देवदूताला मी म्हणालो, “ही काय आहेत?” त्याने मला उत्तर दिले, “इस्राएल, यहूदा व यरूशलेम यांना ज्या शिंगांनी विखरले ती ही आहेत.”

20मग परमेश्वराने मला चार लोहार दाखवले.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
/div>