जखर्‍या 2:1-12 IRVMar - Bible AI

1मग मी माझे डोळे वर करून पाहिले असता मापनसूत्र घेतलेला एक मनुष्य माझ्या दृष्टीस पडला.

2तेव्हा मी त्यास विचारले, “तू कोठे चाललास?” तो मला म्हणाला, “मी यरूशलेमची मोजणी करायाला, तिची लांबी-रुंदी पाहण्यास जात आहे.”

3मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत निघून जात असता दुसरा देवदूत त्याच्याशी बोलायला गेला.

4दुसरा देवदूत त्या पहिल्या देवदूताला म्हणाला, “धावत जा आणि त्या तरुणाशी बोल; त्यास सांग,

5परमेश्वर म्हणतो, ‘मी तिच्या सभोवती अग्नीची भिंत बनेन, आणि मी तिच्यामध्ये गौरवी तेज होईन.”

6परमेश्वर असे म्हणतो, “त्वरा करा, उत्तरेकडील प्रदेशातून पळून जा.

7“अहो! बाबेलकन्येसोबत राहणाऱ्यांनो, सियोनेकडे पळून स्वतःचा बचाव करा!”

8कारण, सेनाधीश परमेश्वराने माझे गौरव केले आणि तुम्हास लुटणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध मला पाठवले आहे;

9“मी आपला हात त्यांच्यावर उगारीन, आणि ते त्यांच्या गुलामांसाठी लूट होतील

10परमेश्वर असे म्हणतो, “हे सियोनकन्ये, हर्षित होऊन गा!

11त्यानंतर त्या दिवसात पुष्कळ राष्ट्रे परमेश्वराकडे येऊन त्यास मिळतील. तो म्हणतो, “तेव्हा तुम्ही माझी प्रजा व्हाल;

12स्वत:ची पवित्र नगरी म्हणून परमेश्वर यरूशलेमची फेरनिवड करील यहूदा म्हणजे परमेश्वराच्या पवित्र भूमीचा वाटा असेल.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
/div>