निर्गम 15:1-26 IRVMar - Bible AI

1नंतर मोशे व इस्राएल लोक यांनी परमेश्वरास हे गीत गाईले. ते म्हणाले,

2परमेश्वर माझे सामर्थ्य व माझे गीत आहे.

3परमेश्वर महान योद्धा आहे;

4त्याने फारोचे रथ व स्वार यांना समुद्रात फेकून दिले;

5खोल पाण्याने त्यांना बुडविले;

6हे परमेश्वरा, तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे;

7तुझ्या वैभवशाली सामर्थ्याने तू तुझ्याविरूद्ध बंड करून उठणाऱ्यांचा नाश करतोस;

8तुझ्या नाकपुड्यांच्या फुंकराने जलाच्या राशी बनल्या.

9शत्रू म्हणाला, मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन, मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन;

10परंतु तू त्यांच्यावर आपला फुंकर वायू सोडलास आणि समुद्राच्या पाण्याने त्यांना गडप केले;

11हे परमेश्वरा, देवांमध्ये तुजसमान कोण आहे?

12तू तुझा उजवा हात उगारला,

13तू उध्दारलेल्या लोकांस तू तुझ्या दयाळूपणाने चालवले आहेस;

14इतर राष्ट्रे ही गोष्ट ऐकून भयभीत होतील;

15मग अदोमाचे अधिकारी हैराण झाले.

16तुझे सामर्थ्य पाहून ते लोक घाबरतील,

17तू तुझ्या लोकांस तुझ्या वतनाच्या पर्वतावर घेऊन जाशील;

18परमेश्वर सदासर्वदा राज्य करील.”

19फारोचे घोडे, स्वार व रथ समुद्रात गेले, या प्रकारे परमेश्वराने त्यांना समुद्राच्या पाण्यात गडप केले; परंतु इस्राएल लोक भरसमुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत पार गेले.

20त्यानंतर अहरोनाची बहीण मिर्याम संदेष्टी हिने हाती डफ घेतला आणि ती व इतर स्त्रिया नाचू लागल्या. मिर्याम हे गीत पुन्हा पुन्हा गात होती;

21मिर्यामने त्यांच्या गाण्याला ध्रुपद धरले.

22मोशे इस्राएल लोकांस तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. ते लोक शूरच्या रानात गेले; त्यांनी तीन दिवस रानातून प्रवास केला; पण त्यांना पाणी कोठे मिळाले नाही.

23तीन दिवस प्रवास केल्यानांतर ते लोक मारा + मारा अर्थ-कडू*नावाच्या ठिकाणी पोहोचले; तेथे पाणी फार कडू असल्यामुळे लोकांस ते पिववेना, म्हणूनच त्या ठिकाणाचे नाव मारा पडले.

24लोक मोशेकडे कुरकुर करीत म्हणाले, “आता आम्ही काय प्यावे?”

25मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्यास एक वनस्पती दाखवली. ती त्याने पाण्यात टाकल्यावर तेव्हा ते पाणी गोड झाले. त्या वेळी परमेश्वराने इस्राएल लोकांस विधी व नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली.

26तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनःपूर्वक ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे योग्य ते करशील, त्याच्या आज्ञांकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील तर मिसरी लोकांवर ज्या व्याधी मी पाठवल्या त्यापैकी एकही तुजवर पाठविणार नाही. कारण मी तुला व्याधी मुक्त करणारा परमेश्वर+ यहोवा-राफा* आहे.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
/div>