1सुज्ञ मुलगा आपल्या पित्याचे शिक्षण ऐकतो,
2आपल्या तोंडच्या फळांनी मनुष्य चांगल्या गोष्टींचा आनंद घेतो,
3जो आपले तोंड सांभाळतो तो आपल्या जीवाचे रक्षण करतो,
4आळशाची भूक हाव धरते पण त्यास काही मिळत नाही,
5नीतिमान लबाडीचा तिरस्कार करतो,
6नीतिमत्ता सात्विक मार्गाने चालणाऱ्यांचे रक्षण करते,
7जो कोणी आपणाला संपन्न करतो, पण त्यांच्याजवळ मात्र काहीच नसते,
8श्रीमंत मनुष्यास जिवाची खंडणी त्याची संपत्ती आहे,
9नीतिमानाचा प्रकाश आनंदाने प्रकाशतो,
10गर्वामुळे भांडण मात्र उत्पन्न होतात,
11वाईट मार्गाने मिळवलेले धन कमी होत जाते,
12जेव्हा आशा लांबणीवर पडते तेव्हा अंतःकरण तुटते,
13जो कोणी शिक्षणाचा तिरस्कार करतो तो स्वतःवर अनर्थ आणतो,
14सुज्ञाची शिकवण जीवनाचा झरा आहे,
15सुबोध अनुग्रह मिळवून देतो,
16शहाणा मनुष्य कृती करण्याआधी विचार करतो.
17दुष्ट निरोप्या संकटात पडतो,
18जर एखाद्याने शिकायला नकार दिला तर त्यास गरीबी आणि लाज प्राप्त होईल,
19इच्छातृप्ती जिवाला गोड लागते,
20शहाण्या लोकांबरोबर चाला म्हणजे तुम्ही शहाणे व्हाल,
21आपत्ती पाप्याच्या पाठीस लागते,
22चांगला मनुष्य आपल्या नातवंडांना वतन देऊन ठेवतो,
23गरीबांचे नांगरलेले शेत विपुल अन्न देते,
24जर कोणी आपल्या मुलांना शिक्षा करत नाही तो त्यांचा द्वेष करतो,