यशया 11:1-15 IRVMar - Bible AI

1इशायाच्या बुंध्याला अंकुर फुटेल, व त्याच्या मुळातून निघालेल्या शाखेला फळ येईल.

2परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, मार्गदर्शन व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याजवर येईल,

3परमेश्वराचे भय त्याचा हर्षोल्हास होईल;

4याउलट तो दीनांचा न्याय चांगुलपणाने करील व पृथ्वीवरील दिनांचा यथार्थ निर्णय करील.

5धार्मिकता त्याचा कमरबंद असेल, आणि विश्वास त्याचा कमरवेष्टन होईल.

6लांडगा कोकरासोबत राहील, आणि चित्ता करडांजवळ बसेल.

7गाय व अस्वल एकत्र चरतील, आणि त्यांचे बच्चे एकत्र लोळतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल.

8तान्हे बाळ सापाच्या वारुळाजवळ खेळेल

9माझ्या संपूर्ण पवित्र डोंगरावर ते उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत;

10त्यादिवशी, इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज निशानी असे उभे होईल.

11त्यादिवशी, असे होईल की प्रभू आपल्या अश्शूर, मिसर, पथ्रोस,

12तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील व इस्राएलातून बहिष्कृत केलेल्या

13तो एफ्राइमाचे वैर संपवेल, आणि यहूदाचे जे विरोधी त्यांचा बिमोड करेल.

14याउलट ते पश्चिमेकडील पलिष्ट्यांच्या टेकड्यांवर झडप घालतील, आणि एकत्रितपणे पूर्वेकडील लोकांस लुटतील.

15परमेश्वर मिसराच्या समुद्राची खाडी दुभागील. आपल्या उष्ण श्वासाने फरात नदीवर आपला हात चालवील,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>