यशया 16:1-13 IRVMar - Bible AI

1जो सेलापासून रानापर्यंत देशावर राज्य करतो

2कारण विखरलेल्या घरट्याप्रमाणे, भटकणाऱ्या पक्ष्याप्रमाणे,

3सूचना दे, न्याय अंमलात आण; दुपारी तू आपली सावली रात्रीसारखी कर; शरणार्थीस लपीव;

4मवाबामधील निर्वासितास, तुझ्यात राहू दे;

5विश्वासाच्या कराराने सिंहासन स्थापित होईल; आणि दावीदाच्या तंबूतून कोणीएक निष्ठावान तेथे बसेल.

6आम्ही मवाबाच्या गर्वाविषयी, त्यांच्या उद्धटपणाविषयी,

7यामुळे मवाब मवाबाकरता आकांत करील, प्रत्येकजण आकांत करील.

8हेशबोनाची शेते व त्याचप्रमाणे सिब्मेच्या द्राक्षवेली सुकून गेल्या आहेत.

9यामुळे मी खरोखर याजेराबरोबर सिब्मेच्या द्राक्षवेलीकरता रडेल.

10उपवनातील फळ झाडांपासून आनंद व उल्लास नाहीसा झाला आहे; आणि तुमच्या द्राक्षमळ्यात तेथे गायनाचा व आनंदाचा गजर होत नाही.

11यामुळे मवाबाकरता माझे अंतःकरण आणि कीर हेरेसासाठी माझे अंतर्याम तंतुवाद्यासारखे उसासे टाकतात.

12जेव्हा मवाब स्वतः उंचस्थानावर जाताना थकेल

13पूर्वीच्या काळी मवाबाविषयी जे वचन परमेश्वर बोलला आहे ते हेच आहे.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>