यशया 23:1-17 IRVMar - Bible AI

1सोर विषयी देववाणी,

2समुद्रतीरीच्या रहिवाश्यांनों, आश्चर्यचकित व्हा,

3आणि महान जलांवरून

4हे सीदोना लज्जीत हो, कारण समुद्र, समुद्रातील पराक्रमी, बोलला आहे, तो म्हणतो,

5मिसर देशात हे वर्तमान कळेल तेव्हा तेथे सोर निवासिया साठी मोठा शोक केला जाईल.

6तार्शीशास पार जा, समुद्रतीरी राहणाऱ्यांनो तुम्ही आकांत करा.

7अति आनंदी, सुखी व वैभवशाली नगरी, हे तुमच्या बाबतीत घडले आहे, पूर्वीच्या काळापासून ती प्रसिध्द व नावजलेली होती,

8मुकुट देणार हे सोर, ज्याचे व्यापारी अधिकारी आहेत, ज्याचे वाणी पृथ्वीतले प्रतिष्ठीत आहेत, त्या विषयी हे कोणी योजीले?

9सर्व शोभेच्या वैभवाला डाग लावण्यासाठी व पृथ्वीतल्या सर्व प्रतिष्ठांना अप्रतिष्ठीत करण्यासाठी सेनाधीश परमेश्वराने हे योजिले आहे.

10हे तार्शीशच्या कन्ये नील नदीप्रमाणे आपली भूमी नांगर. सोर मध्ये तुला व्यापारी ठिकाण नाही.

11परमेश्वराने आपला हात समुद्रावर उगारला आहे आणि त्याने राज्ये हालवून टाकली.

12तो म्हणतो, “हे कलंकीत भ्रष्ट झालेली सीदोन कन्ये तू येथून पुढे आनंदीत होणार नाहीस,

13खास्दयांचा + बाबेल*देश पाहा तो आता नामशेष आहे, अश्शूर देशातील लोकांनी त्यास ओसाड करण्यासाठी जंगली पशुच्या स्वाधिन केले आहे

14तार्शीशच्या जहाजांनो हाय हाय करा विलाप करा कारण तुमचे बंदर पूर्ण पणे नाश पावलेले आहे.

15त्या दिवसात असे घडेल की सर्व जगाला सोराची विस्मृती सतर वर्षेपर्यंत पडेल, सोर प्रदेशाची कोणालाच आठवण राहणार नाही तो पर्यंत एका राजाची कारकिर्द संपेल.

16हे विसरलेल्या वेश्ये, वीणा घे आणि नगरात फिर,

17सत्तर वर्षाच्या शेवटी असे होईल की परमेश्वर देव सोराची मदत करील, तेव्हा ते आपल्या वेतनाकडे फिरेल, आणि भूमीच्या सर्व पाठीवर पृथ्वीतल्या सर्व राज्यांशी व्यभिचार करेल.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>