यशया 24:1-22 IRVMar - Bible AI

1पाहा परमेश्वर पृथ्वीला ओसाड व रिकामी करीत आहे, तो त्यातील राहणाऱ्यांची पागांपांग करीत आहे.

2आणि जशी लोकांची तशी याजकांची, जशी सेवकाची तशी धन्याची, जशी दासीची तशी तिच्या धनिणीशी,

3पृथ्वी पूर्णपणे उध्वस्त केली जाईल आणि नागाविली जाईल,

4मेघ पाऊस पाडीत नाही म्हणून, पृथ्वी सुकून गेली आहे, पाणी आटून गेले आहे पृथ्वीवरील सज्जन म्हणवणाऱ्या पापी लोकांनी तिचा नाश केला आहे.

5पृथ्वीवरच्या लोकांनी परमेश्वराने दिलेले विधि व नियमांचे पालन केले नाही, विधींचे अतिक्रमण केले,

6त्यामुळे सार्वकालिक करार शापित झाला आहे व तेथे राहणारे दोषी आढळले आहेत. त्यांना त्याचे फळ भोगावे लागत आहे; शापाचा परिणाम म्हणून पुष्कळ लोक भस्म होतील व फार थोडे उरतील.

7नवीन द्राक्षरस वाळून गेला, द्राक्षवेल सुकले आहेत, सर्व आनंदोत्सव करणारे कण्हत आहेत.

8डफांचा आनंदी आवाज आणि हर्षाने जे मौजमजा करीत ते थांबले आहेत,

9ते आता मद्य पीता-पीता गाणी गाणार नाहीत, आणि त्यांना जे मद्य पीतात ती आता कडू होईल.

10अंदाधूंदी असलेली नगरी मोडून पडली आहे, प्रत्येक घर बंद आणि रिकामे आहे.

11द्राक्षरसामुळे चौका चौकात रडणे आहे.

12नगरात ओसाडी उरली आहे, आणि दरवाज्याचा नाश झाला आहे.

13द्राक्षांचा हंगाम सपंल्यावर व जैतून वृक्ष हलविल्यावर, झाडावर जशी थोडीशी फळे उरतात

14ते आपला आवाज उंचावतील आणि परमेश्वराचे ऐश्वर्य ओरडतील,

15यास्तव पूर्वेत परमेश्वराचे गौरव करा,

16पृथ्वीच्या सीमेतून आम्ही अशी गीते ऐकली आहेत की, “धार्मिकास वैभव असो.”

17पृथ्वीतील राहणाऱ्यांनो, भीती व खांच आणि पाश ही तुझ्यावर आहेत.

18जो भीतीच्या आवाजापासून पळेल तो खांचेत पडेल, आणि जो खांचेमधून वर निघेल तो पाशात पडेल.

19पृथ्वी अगदी मोडून गेली आहे, पृथ्वी फाटली आहे.

20पृथ्वी एखाद्या मद्यप्यासारखी झोकांड्या खाईल, आणि एखाद्या टांगत्या बिछान्याप्रमाने झोके खाईल,

21त्या दिवशी असे होईल की परमेश्वर उंच ठिकाणी असलेल्या सैन्याला उंच ठिकाणी, आणि पृथ्वीच्या राजांना पृथ्वीवर शिक्षा करेल.

22त्यांना एकत्रित करून अंधार कोठडीत आणि कारागृहात बंद करून ठेवील,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>