यशया 25:1-11 IRVMar - Bible AI

1हे परमेश्वरा, तू माझा देव आहेस, मी तुला उंच करीन, मी तुझी स्तुती करीन.

2कारण तू शत्रूंच्या नगराला ढीग केले आहेस, तटबंदीच्या नगराला ओसाडी असे केले आहेस,

3याकरिता सामर्थ्यवान लोक तुझे गौरव करतील व निर्दयी राष्ट्रे तुला भीतील.

4कारण तू गोरगरीबांचा रक्षणकर्ता आहेस, गरजूंना त्यांच्या दुःखाच्या समयी तू संरक्षक असा आहेस.

5उन्हाच्या तापाने तापलेली भूमी मेघाच्या छायेने थंड होते, तसे जे निर्दय शत्रू आहेत ह्यांच्या गर्जना शांत करशील

6तेव्हा या सीयोन डोंगरावर म्हणजेच येरुशलेमेत सेनाधीश परमेश्वर आपल्या लोकांस मेजवानी तेथे उत्तमोत्तम चवदार पदार्थ असतील मांसाचे मज्ज सहीत तुकडे असतील,

7त्यावेळी पापाचे मेघपटल व मृत्यूछायेचे सावट तो या डोंगरावरून लोकांपासून दूर करील व त्यांना मोकळे करील.

8तो मरणाला कायमचे नाहीसे करील, परमेश्वर सर्वांच्या डोळ्यांचे अश्रू पुसून टाकील

9सर्व लोक त्या दिवशी म्हणतील व घोषणा देऊन सांगतील, “पाहा हा आमचा देव आहे त्याच्यावर आमचा विश्वास आहे त्याची आम्ही वाट पाहातो,

10कारण परमेश्वराचा हात यरूशलेमेला आर्शीवाद देण्यासाठी

11पाण्यात पोहणारा पोहण्यासाठी हातांनी पाणी सारतो तसेच देव त्यांना दूर सारील व त्यांचा सर्व अभिमान,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>