यशया 29:1-23 IRVMar - Bible AI

1अरीएल+ देवाचा क्रोध किंवा यरूशलेम शहर *, अरीएल, म्हणजे ते शहर ज्यात दाविदाने तळ दिला, तिला हायहाय!

2पण मी अरीएलला शिक्षा करीन आणि त्यामुळे ती दु:ख व शोक करील,

3मी तुझ्यासभोवती तळ घालून तुला वेढीन,

4तू नीच केली जाशील आणि भूमीवरून बोलशील. तुझा आवाज धुळीतून कमी निघतील,

5तुझ्या शत्रूंचा समुदाय धुळीच्या कणांसारखा आणि निर्दयांचा समुदाय उडत्या भुसासारखा होईल

6सेनाधीश परमेश्वराकडून, भूकंप, मोठीगर्जना व मोठे वादळ, वावटळ आणि खाऊन टाकणारी अग्नी, यांनी तुला शासन करण्यात येईल.

7ते सर्व रात्रीच्या आभासासारखे असेल,

8हे असे असणार की एक भुकेला मनुष्य आपण खात आहे असे स्वप्न पाहतो, पण जेव्हा तो जागा होतो तर त्याचे पोट रिकामेच असते.

9तुम्ही विस्मित व आश्चर्यचकित व्हा, तुम्ही आपणास आंधळे करा आणि आंधळे व्हा.

10कारण परमेश्वराने तुम्हावर गाढ झोपेचा आत्मा ओतला आहे.

11तुम्हास सर्व दर्शन शब्द, मोहरबंद केलेल्या पुस्तकाच्या शब्दाप्रमाणे झाले आहेत. तुम्ही असे पुस्तक वाचता येणाऱ्याला देऊन त्यास वाचायला सांगू शकता. पण तो म्हणेल. “मी हे पुस्तक वाचू शकत नाही. ते मोहरबंद आहे.”

12किंवा तुम्ही असे पुस्तक वाचता न येणाऱ्याला देऊन त्यास ते वाचायला सांगू शकता. तो म्हणेल, “मला वाचता येत नसल्याने मी हे पुस्तक वाचू शकत नाही.”

13माझा प्रभू म्हणतो, हे लोक, माझ्यावर त्यांचे प्रेम आहे, असे म्हणतात ते शब्दांनी माझ्याबद्दलचा आदर व्यक्त करतात.

14म्हणून मी शक्तीशाली व चमत्कारिक गोष्टी करून या लोकांस विस्मित करीत राहीन. आश्चर्या मागून आश्चर्य,

15जे परमेश्वरापासून आपल्या योजना खोल लपवतात,

16तुम्ही गोष्टींची उलटफेर करता! कुंभार मातीप्रमाणे आहे असे मानतील काय? एखाद्याने तयार केलेली वस्तूच त्या तयार करणाऱ्याला बोलेल काय? “तू मला घडवले नाहीस, आणि त्यास काही समजत नाही” असे घडलेली वस्तू आपल्या घडवणाऱ्याविषयी बोलेल काय?

17काही काळाच्या आत

18त्या दिवशी बहिरा पुस्तकातील शब्द ऐकू शकेल

19पीडलेले पुन्हा परमेश्वराच्या ठायी आनंद करत राहतील

20कारण निर्दयींचा अंत होईल आणि उपहास करणारा नाश होईल. दुष्कृत्ये करण्यात आनंद मानणारे सर्व काढले जातील.

21जे मनुष्यांना शब्दाने खोटे पाडतात. ते त्याच्यासाठी पाश मांडतात

22परमेश्वर, ज्याने अब्राहामाला खंडून घेतले, परमेश्वर याकोबाच्या घराण्याविषयी असे बोलतो.

23पण जेव्हा तो त्याची सर्व मुले पाहील, जे माझ्या हातचे कार्य असेल, ते माझे नाव पवित्र मानतील.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>