यशया 34:1-16 IRVMar - Bible AI

1तुम्ही राष्ट्रांनो, जवळ या व ऐका; तुम्ही लोकांनो, लक्ष द्या! पृथ्वी व तीने भरलेल्या, जग आणि त्यातून येणाऱ्या सर्व गोष्टी ऐकोत.

2कारण सर्व राष्ट्रावर परमेश्वर रागावला आहे आणि त्यांच्या सैन्यांविरूद्ध संताप झाला आहे;

3त्यांच्यातील वधलेल्यास न पुरताच ठेवून देतील; त्यांच्या मृत शरीराची दुर्गंधी सर्वत्र पसरेल,

4आकाशातील सर्व तारे निस्तेज होतील,

5ज्यावेळेस माझी स्वर्गीय तलवार रक्ताने माखेल,

6परमेश्वराची तलवार आच्छादली असून रक्त गाळीत आहे,

7रानबैलांची आणि तरूण बैलाबरोबर, वृद्धाची त्यांच्याबरोबर कत्तल करण्यात येईल.

8कारण सूड घेण्याचा परमेश्वराचा दिवस आहे. आणि सियोनेवर अन्यायाची भरपाई करण्याचे वर्ष परमेश्वराने निश्चित केले आहे.

9अदोमातील प्रवाह बदलून डांबर होतील, तिची धूळ गंधक होईल,

10तो रात्र व दिवस पेटत राहील. त्याचा धूर निरंतर वर चढत जाईल.

11पण हिंस्त्र पक्षी आणि प्राणी तिथे राहतील; घुबडे आणि डोमकावळे तेथे आपली घरटी करतील.

12तिच्या सरदारांना

13तिच्या महालात काटेरी झाडे वाढतील, आणि तिच्या किल्ल्यात खाजकुईलीची झाडे व काट्यांची झाडे उगवतील.

14हिंस्त्रपशू तरसांबरोबर तेथे भेटतील आणि रानबोकडे एकमेकास हाक मारतील. आपल्या मित्रांना हाका मारतील.

15तेथे घुबड आपल्यासाठी घरटे करेल, अंडी घालून ती उबवतील. आणि आपल्या पिल्लांचे रक्षण करतील.

16परमेश्वराच्या ग्रंथातून शोधा, यातून एकही सुटणार नाही.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>