यशया 35:1-9 IRVMar - Bible AI

1निर्जन आणि रुक्ष भूमी आनंदी होईल; आणि निर्जल आनंद देईल आणि

2ते विपुलतेने बहरेल आणि हर्ष व गायन करून आनंद करतील;

3दुर्बल हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा.

4जे भिणाऱ्या हृदयाचे आहेत त्यांना म्हणा, “सामर्थ्यवान व्हा, भिऊ नका;”

5मग आंधळ्यांचे डोळे उघडतील आणि बहिऱ्यांचे कान ऐकतील.

6नंतर लंगडे हरणाप्रमाणे उड्या मारील आणि मुक्याची जीभ गाणे गाईल.

7मृगजले तलाव आणि तहानलेली जमीन पाण्याचे झरे होईल;

8तेथील महामार्गाला पवित्रतेचा मार्ग असे म्हणतील.

9तेथे सिंह नसतील, हिंस्त्र श्वापदे त्यावर चढणार नाहीत; ते तेथे सापडणार नाहीत,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
v>