यशया 4:1-5 IRVMar - Bible AI

1त्या दिवशी सात स्त्रिया एका पुरुषाला ताब्यात घेऊन

2त्या दिवशी परमेश्वराचे रोपटे सुंदर व गौरवी होईल. इस्राएलात राहणाऱ्याकरिता भूमीचे फळ चविष्ट व आनंददायी होईल.

3यानंतर जो कोणी सियोनात राहील, जो कोणी यरूशलेमेत बाकी राहील, प्रत्येक जण जो कोणी येरुशलेमेत जिवंत असा गणला जाईल त्यास पवित्र असे म्हणतील,

4ज्या वेळेस परमेश्वर सियोनेच्या कन्यांची अशुद्धता दूर करेल, आणि यरूशलेमेच्या गर्भातील रक्ताचे डाग त्याच्या न्यायाच्या आत्म्याने व ज्वलंत अग्नीच्या आत्म्याने स्वच्छ करील तेव्हा हे होईल.

5नंतर परमेश्वर सियोन पर्वताच्या संपूर्ण जागेवर व तिच्या मेळ्यांच्या जागेवर दिवसा ढग व धूर, आणि रात्री जळत्या अग्नीच्या ज्वालेचा प्रकाश, परमेश्वराच्या वैभवाचे छत, निर्माण करील.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
>