1तर आता हे याकोबा, ज्या कोणी तुला उत्पन्न केले आणि हे इस्राएला, ज्या कोणी तुला घडवले, तो परमेश्वर असे म्हणतो,
2जेव्हा तू पाण्यातून जाशील, मी तुझ्या बरोबर असेल; आणि नद्यातून जाशील त्या तुला पूर्ण झाकणार नाहीत.
3कारण मी तुझा देव परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू, तुझा तारणारा आहे.
4तू माझ्या दृष्टीने मोलवान आणि विशेष आहेस, मी तुझ्यावर प्रीती करतो;
5घाबरू नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे; मी पूर्वेपासून तुझी संतती आणीन, आणि पश्चिमेकडून तुला एकत्र गोळा करीन.
6मी उत्तरेला म्हणेन, त्यांना देऊन टाक; आणि दक्षिणेला म्हणेन, कोणालाही मागे धरून ठेवू नको;
7ज्या प्रत्येकाला माझ्या नावाने बोलावले आहे, ज्याला मी माझ्या गौरवासाठी निर्मिले आहे, ज्याला मी घडविले, होय! ज्याला मी केले आहे.
8जे कोणी डोळे असून आंधळे व कान असून बहिरे त्यांना बाहेर आण.
9सर्व राष्ट्रे एकत्र जमोत आणि लोकांनी एकत्र गोळा होवोत.
10परमेश्वर जाहीर करतो, तुम्ही माझे साक्षीदार आहात आणि माझा सेवक ज्याला मी निवडले आहे,
11मी, मीच परमेश्वर आहे आणि माझ्यावाचून कोणीही तारणारा नाही.
12मीच तारण जाहीर केले आहे, आणि घोषणा करतो आणि तुमच्यात कोणी दुसरा देव नाही.
13यादिवसापासून मीच तो आहे,
14परमेश्वर, तुमचा उद्धारक, इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो,
15मी परमेश्वर आहे, तुमचा पवित्र प्रभू, इस्राएलाचा निर्माणकर्ता, तुमचा राजा आहे.
16परमेश्वर जो समुद्रातून मार्ग आणि प्रचंड पाण्यातून वाट उघडतो,
17जो रथ व घोडा, सैन्य व वीर यांना बाहेर काढून आणतो. ते एकत्रित खाली पडतात;
18पूर्वीच्या या गोष्टींबद्दल विचार करू नका, किंवा फार पूर्वीच्या गोष्टी मनात आणू नका.
19पाहा, मी एक नवी गोष्ट करणार आहे; आता ती घडण्याची सुरवात होत आहे; तुम्ही ती पाहणार नाही का?
20रानातले वनपशू कोल्हे व शहामृग मला मान देतील,
21या लोकांस मी आपल्यासाठी निर्मिले, त्यांनी माझी स्तुतिस्तोत्रे कथन करावी.
22हे याकोबा, तू मला हाक मारली नाहीस; हे इस्राएला, तू मला कंटाळला आहेस.
23तू मला होमार्पणासाठी आपल्या मेंढरातील एकही माझ्याकडे आणले नाहीस;
24तू माझ्यासाठी गोड सुगंधीत ऊस पैका देऊन आणला नाही, आपल्या यज्ञबलीच्या वपेने तू मला तृप्त केले नाहीस.
25मी, होय! मी आपल्यासाठी तुझी पापे पुसून टाकतो; तो मी, मीच आहे, आणि तुझी पातके यापुढे मी लक्षात ठेवणार नाही.
26जे घडले त्याची मला आठवण दे. आपण परस्पर वाद करू; तू न्यायी सिद्ध व्हावे म्हणून तू आपला वाद पुढे मांड.
27तुझ्या पहिल्या पित्याने पाप केले आणि तुझ्या शिक्षकांनी माझ्याविरूद्ध अपराध केला आहे.