यशया 52:1-14 IRVMar - Bible AI

1सियोने, जागी हो, जागी हो, आपली शक्ती धारण कर,

2तुझ्या अंगावरची धूळ झटक, यरूशलेमे, ऊठ, उठून बस,

3परमेश्वर म्हणतो, “तुम्ही फुकट विकले गेला होता, आणि तुमची मुक्तता पैशावाचून करण्यात आली आहे.”

4कारण परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “सुरूवातीला माझे लोक खाली मिसरांत तात्पुरते राहण्यासाठी गेले होते.

5परमेश्वर असे म्हणतो, काय घडले आहे ते आता पाहा माझ्या लोकांस फुकट नेण्यात आले आहे, तर आता माझे इथे काय काम आहे? जे त्यांच्यावर अधिकार चालवतात ते आक्रंदन करतील आणि पूर्ण दिवस माझ्या नावाची निंदा होत आहे.”

6यास्तव माझे लोक माझे नाव जाणतील,

7“शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोन,

8तुझ्या पाहारेकऱ्यांचा उंचावलेला आवाज ऐक, ते एकत्र येऊन हर्षाने ओरडत आहेत.

9यरूशलेमेच्या ओसाड स्थळांनो, आनंदाने एकत्र गायन करीत सुटा,

10परमेश्वराने सर्व राष्ट्रांसमोर आपला पवित्र भूज दिसण्याजोगा केला आहे.

11तुम्ही निघा, तुम्ही निघा, तुम्ही येथून निघून जा, अपवित्र गोष्टींना स्पर्श करू नका.

12कारण तुम्ही घाईने निघणार नाही, किंवा तुम्हास पळून जाणे भाग पडणार नाहीत.

13माझ्या सेवकाकडे पाहा. तो सुज्ञपणे व्यवहार करणार आणि यशस्वी होणार.

14“माझ्या सेवकाला पाहून खूप लोकांस धक्का बसला.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>