यशया 54:1-16 IRVMar - Bible AI

1“तू वांझ स्त्री, तू जन्म दिला नाहीस; ज्या तुला प्रसूतिवेदना नाहीत, ती तू आनंदाने आणि मोठ्याने आरोळी मारून जयघोष करून गायन कर.

2तू आपला तंबू मोठा कर आणि तंबूचे पडदे अधिक दूर बाहेर पसरण्याचे थांबू नको;

3कारण उजवीकडे आणि डावीकडे तुझा विस्तार होईल,

4घाबरू नकोस कारण तू लज्जित होणार नाहीस किंवा निराश होऊ नको कारण तू कलंकीत होणार नाहीस;

5कारण तुझा निर्माता तुझा पती आहे; त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे.

6कारण तुला त्यागलेली आणि आत्म्यात दुःखीत पत्नीप्रमाणे परमेश्वर तुला परत बोलावित आहे,

7मी तुला थोड्या वेळासाठी सोडले, परंतु मोठ्या करुणेने मी तुला एकत्र करीन.

8मी रागाच्या भरात क्षणभर आपले तोंड तुजपासून लपवले;

9“कारण नोहाच्या जलाप्रमाणे हे मला आहेः

10जरी पर्वत कोसळतील आणि टेकड्या ढळतील,

11अगे जाचलेले, वादळाने मस्त झालेले आणि सांत्वन न पावलेले,

12तुझा कळस माणकांचा आणि तुझ्या वेशी मी चकाकणारी रत्ने करीन,

13आणि तुझ्या सर्व मुलांना परमेश्वर शिकवील; आणि तुमच्या मुलांची शांती महान असेल.

14नीतिमत्तेत तू स्थापीत होशील.

15पाहा, जर कोणीएक अशांतता निर्माण करीत असेल, तर ती माझ्यापसून नाही; कोणीएक तुझ्याबरोबर अशांतता निर्माण करतो तो अपयशात पडेल.

16पाहा, मी लोहाराला निर्माण केले, जो तो विस्तव फुलावा म्हणून हवा फुंकतो

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>