यशया 6:1-12 IRVMar - Bible AI

1उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी मी प्रभूला सिहांसनावर बसलेले पाहीले; तो उंच आणि उंच चढविलेला होता; आणि त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदीर भरून गेले होते.

2त्याच्याबाजूला सराफीम होते; प्रत्येकाला सहा पंख होते; दोहोंनी प्रत्येकजण आपला चेहरा झाकीत; आणि दोहोंनी आपले पाय झाकी; आणि दोहोंनी उडे.

3प्रत्येकजण दुसऱ्याला हाक मारीत आणि म्हणत, “पवित्र, पवित्र, पवित्र, सेनाधीश परमेश्वर! त्याच्या गौरवाने सर्व पृथ्वी भरून गेली आहे.”

4जे कोणी घोषणा करीत होते त्यांच्या वाणीने दरवाजे व उंबरठे हादरले, आणि मंदिर धुराने भरून गेले.

5तेव्हा मी म्हणालो,

6मग सराफीमामधील एक माझ्याकडे उडत आला; त्याच्या हातात एक धगधगीत इंगळ होता, तो त्याने एका चिमट्याने वेदीवरुन उचलला होता.

7त्याने तो माझ्या तोंडाला स्पर्श केले आणि म्हटले,

8मी प्रभूची वाणी बोलताना ऐकली ती अशी, “मी कोणाला पाठवू; आमच्यासाठी कोण जाईल?” मग मी म्हणालो, “मी येथे आहे; मला पाठव.”

9तो म्हणाला, “जा आणि या लोकांस सांग,

10त्यांनी डोळ्यांनी पाहू नये किंवा कानांनी ऐकू नये आणि त्याच्या हृदयाने समजू नये,

11तेव्हा मी म्हटले, “प्रभू, असे किती वेळपर्यंत?” त्याने उत्तर दिले,

12आणि परमेश्वर लोकांस खूप दूर घालवून देईपर्यंत आणि देशात एकाकीपण येईपर्यंत.

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
v>