1जो अदोमाहून येत आहे, जो लाल वस्रे घातलेला बस्राहून येत आहे, तो कोण आहे?
2तुझी वस्त्रे लालभडक का? आणि ती का द्राक्षांचा रस काढण्याऱ्याच्या कपड्यासारखी आहेत?
3“मी एकट्यानेच द्राक्षकुंड तुडवले आहे आणि राष्ट्रांतील कोणी माझ्याबरोबर नव्हता.
4कारण प्रतिकाराच्या दिवसा कडे पाहत आहे, आणि माझ्या खंडून घेतलेल्यांचे वर्ष आले आहे.
5मी पाहिले आणि मला मदत करण्यासाठी कोणीही नव्हते. कोणीही मदतीला नाही म्हणून मला आश्चर्य वाटले.
6माझ्या रागात मी लोकांस पायाखाली तुडवले आणि त्यांना माझ्या रागात मस्त केले आणि त्यांचे रक्त मी पृथ्वीवर उडवले.
7मी परमेश्वराच्या कराराचा विश्वासूपणा आणि त्याची प्रशंसनीय कृत्ये सांगेन.
8कारण तो म्हणाला, खचित हे माझे लोक आहेत, मुले, जी विश्वासघातकी नाहीत.
9त्यांच्या सर्व दु:खात,
10पण त्यांनी बंड केले आणि त्याच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले.
11त्याच्या लोकांनी मोशेच्या प्राचीन काळाविषयी विचार केला.
12ज्याने आपले वैभवशाली सामर्थ्य मोशेच्या उजव्या हाताने पुढे नेले,
13तो देव कोठे आहे? ज्याने त्यांना खोल समुद्रामधून चालवत नेले, जसा घोडा सपाट जमिनीवर धावत सुटतो, तसे ते अडखळले नाहीत.
14परमेश्वराने त्यांना खोऱ्यात उतरत जाणाऱ्या गुरांप्रमाणे विसावा दिला.
15स्वर्गातून खाली पाहा आणि तुझ्या पवित्र व तेजोमय वस्तीतून नोंद घे.
16तू तर आमचा पिता आहेस,
17परमेश्वरा, तू आम्हास तुझ्यापासून मार्गातून का बहकू देतोस आणि तुझ्या आज्ञा न पाळाव्यात म्हणून तू आमचे हृदये कठीण का करतोस?
18तुझी माणसे थोडाच वेळ तुझे पवित्र स्थान ताब्यात घेतील, पण आमच्या शत्रूंनी तुझे पवित्र मंदिर पायाखाली तुडवले.