1यरूशलेम नगरी जी लोकांनी भरलेली असे, आता ती पूर्णपणे एकटी बसली आहे.
2ती रात्री फार रडते व तिचे अश्रू तिच्या गालांवर असतात.
3दारिद्र्य आणि जुलमामुळे यहूदा दास्यपनात बंदिवान झाली आहे.
4सियोनेचे मार्ग शोक करतात, कारण नेमलेल्या पवित्र सणाला कोणीही येत नाही.
5तिचे शत्रू तिचे धनी झाले आहेत; तिच्या वैऱ्यांची उन्नती झाली आहे.
6सियोनकन्येचे सौंदर्य सरले आहे.
7यरूशलेम आपल्या कष्टाच्या व बेघर होण्याच्या दिवसात,
8यरूशलेमेने फार पाप केले आहेत; म्हणून ती अशुद्ध झाली आहे.
9तिचा विटाळ तिच्या अंगावरील वस्राला लागला आहे, तिने आपल्या भविष्यातील शिक्षेचा नीट विचार केला नाही.
10तिच्या सर्व मौल्यवान खजिन्यावर शत्रूंनी आपला हात ठेवला आहे.
11यरूशलेमेमधील सर्व लोक कण्हत आहेत, ते अन्न शोधत आहेत.
12“जे तुम्ही जवळून जाता, तुम्हास काहीच वाटत नाही काय?
13त्याने वरून माझ्या हाडात अग्नी पाठवला आहे, आणि तो त्याजवर प्रबल होतो.
14माझ्या पुष्कळ अपराधांचे जू त्याने आपल्या हाताने जखडले आहे.
15माझ्या शूर सैनिकांना जे माझे रक्षण करतात, त्यांना परमेश्वराने दूर फेकले आहे.
16या सगळयाबद्दल मी आक्रोश करते; माझ्या डोळयांतून अश्रू पाण्याप्रमाणे वाहात आहेत.
17सियोनने तिचे हात पसरवले, पण तिचे सांत्वन करायला कोणी नाही.
18“परमेश्वर न्यायीच आहे, कारण मी त्याच्या आज्ञेविरूद्ध बंड केले आहे.
19मी माझ्या प्रियकरांना हाका मारल्या, पण त्यांनी माझ्याबरोबर विश्वासघात केला.
20हे परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! कारण मी दु:खी झाले आहे. माझ्या आतड्यांना पीळ पडला आहे.
21मी कण्हत आहे हे त्यांनी ऐकले आहे. माझे सांत्वन करायला कोणी नाही.