1हे परमेश्वरा, आमची अवस्था काय झाली याकडे लक्ष लाव.
2आमचे वतन परक्यांच्या हातात गेले आहे.
3आम्ही अनाथ झालो. आम्हास वडील नाहीत.
4आम्हास पिण्याच्या पाण्यासाठी रूपे द्यावे लागतात;
5आमचा पाठलाग करणारे आमच्या मानगुटीस बसले आहेत.
6पोटभर भाकरी मिळविण्यासाठी आम्ही मिसर व अश्शूर यांच्यासमोर आम्ही आपले हात पुढे केले.
7आमच्या पूर्वजांनी तुझ्याविरुध्द पाप केले. आता ते नाहीत.
8गुलाम आमच्यावर राज्य करतात.
9राणात चालू असलेल्या तलवारीमुळे आम्ही आपला जीव मुठीत घेऊन आपले अन्न मिळवतो.
10आमची कातडी भट्टीप्रमाणे तापली आहेत.
11सियोनेतील स्त्रियांवर आणि यहूदा नगरातील कुमारीवर त्यांनी अत्याचार केला;
12त्यांनी आमच्या राजपुत्रांना फासावर दिले;
13आमच्या तरुणांना त्यांनी पिठाच्या जात्यावर दळावयास लावले.
14वृध्द आता नगरीच्या द्वारात बसत नाहीत.
15आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे.
16आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे.
17या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे.
18सियोनचे डोंगर ओसाड झाले आहेत.
19पण परमेश्वरा, तुझी सत्ता निरंतन आहे.
20परमेश्वर तू आम्हास कायमचा विसरला आहेस असे दिसते.
21परमेश्वरा, आम्हास तुझ्याकडे परत वळव.
22तोपर्यंत आमचा धिक्कार होऊन आमच्याप्रती तुझा क्रोध अतिभयंकर असेल.