1अम्मोनी लोकांविषयी परमेश्वर असे म्हणतो,
2यास्तव परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की,
3हे हेशबोना, विलापात आक्रोश कर, कारण आय याचा नाश झाला आहे! राब्बातील कन्यांनो, मोठ्याने ओरडा! तागाची वस्त्रे घाला,
4तू आपल्या सामर्थ्याबद्दल का गर्व करते? हे अविश्वासू कन्ये, तुझे सामर्थ्य दूर वाहून जाईल,
5सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, मी तुझ्यावर दहशत आणीन.
6परंतु यानंतर मी अम्मोनी लोकांचा बंदिवास उलटवीन. असे परमेश्वर म्हणतो.
7अदोमाविषयी, सेनाधीश परमेश्वर हे म्हणतो, “तेमानात आता काही ज्ञान नाही काय?
8ददानातल्या रहिवाश्यांनो, पळा! माघारी फिरा! जमिनीतल्या विवरात रहा.
9जर द्राक्षे काढणारे तुझ्याकडे आले, तर ते थोडे मागे ठेवणार नाहीत का?
10पण एसावाचे कपडे काढून त्यास उघडे केले आहे. मी त्याची लपण्याची ठिकाणे उघड केली आहेत.
11तुझे अनाथ मागे ठेव. मी त्यास जिवंत ठेवण्याची काळजी घेईल आणि तुझ्या विधवा माझ्यावर भरवसा ठेवू शकतील.”
12कारण परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, ज्यांची योग्यता नाही त्यांना खचित काही पेला प्यावा लागेल. तर तू स्वतःशी असा विचार करतो की तू शिक्षेशिवाय राहशील? तुला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही, कारण तुला तो खचित प्यावा लागेल.”
13परमेश्वर म्हणतो, “कारण मी आपलीच शपथ वाहिली आहे की, बस्रा दहशत, निंदा, उध्वस्त, आणि शापासाठीचा विषय होईल. ते शहर पडझड झालेल्या दगडांची रास होईल. त्यांची सर्व नगरे कायमची उध्वस्त होतील.”
14मी परमेश्वराकडून वर्तमान ऐकले आहे की, राष्ट्रांकडे दूत पाठविला आहे,
15कारण पाहा, दुसऱ्या राष्ट्रांच्या तुलनेत मी तुला लहान, लोकांकडून तुच्छ केले आहे.
16जी तू खडकाच्या कपाऱ्यांमध्ये राहतेस व डोंगरांचा माथा धरून राहतेस
17तेथून जाणाऱ्या प्रत्येकाला अदोम दहशत होईल.
18परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांचे शेजारी यांना जसे उलथून टाकले तसे होईल.
19“पाहा, तो सिंहासारखा यार्देनेच्या वनातून वर टिकाऊ कुरणाच्या देशात येईल.
20म्हणून अदोमाविरूद्ध परमेश्वराने ठरवलेली योजना काय आहे?
21त्यांच्या पडण्याच्या आवाजाने धरणी हादरेल. त्यांच्या दुःखाचा आक्रोश तांबड्या समुद्रापर्यंत ऐकू येत आहे.
22पाहा, कोणीतरी गरुडासारखा हल्ला करील आणि खाली झडप घालील व बस्रावर आपले पंख पसरेल.
23दिमिष्काविषयीः हमाथ व अर्पद लज्जित होतील, कारण त्यांनी अरिष्टाची बातमी ऐकली आहे.
24दिमिष्क फार दुबळे झाले आहे. ती पळून जाण्यास माघारी फिरली आहे. दहशतीने तिला वेढले आहे.
25तिचे लोक म्हणतात, “प्रसिद्ध नगरी, ज्या एक नगरीवर मी हर्ष करीत होते. अजूनपर्यंत कशी खाली केली नाही?
26म्हणून त्याची तरुण माणसे त्याच्या चौकात पडतील
27“कारण मी दिमिष्काच्या तटाला आग लावीन. आणि ती बेन-हदादचे बालेकिल्ले खाऊन टाकील.”
28केदाराविषयी व हासोराची राज्ये, परमेश्वर नबुखद्नेस्सरास हे म्हणत आहे (आता बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर या ठिकणी हल्ला करण्यास जाणार होता)
29त्यांचे सैन्य त्यांचे तंबू व त्यांचे कळप, त्यांच्या तंबूचे पडदे व त्यांचे सर्व साहित्य घेऊन जातील.
30परमेश्वर म्हणतो, पळा! हासोराच्या रहिवाश्यांनो, दूर भटका, जमिनीच्या विवरात रहा.
31परमेश्वर म्हणतो, उठा! स्वस्थ व सुरक्षित राहणाऱ्या राष्ट्रावर हल्ला करा.
32कारण त्यांचे उंट लुटले जातील व त्यांची विपुल संपत्ती युद्धाची लूट अशी होईल.
33“हासोर कोल्ह्यांची वस्ती होईल, कायमचे ओसाड होईल.
34यहूदाचा राजा सिद्कीया याच्या राज्याच्या सुरवातीच्या काळात एलामाविषयी यिर्मया संदेष्ट्याकडे परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले,
35सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, त्यांच्या बलाचा मुख्य भाग एलामाचे धनुर्धारी माणसे यांना मी लवकरच मोडीन.
36कारण मी आकाशाच्या चार कोपऱ्यातून चार वारे आणीन,
37म्हणून मी एलामाच्या शत्रूसमोर आणि जे त्याचा जीव घेऊ पाहतात त्यांच्यासमोर तुकडे तुकडे करीन.
38मग मी एलामात आपले राजासन ठेवीन आणि तेथून त्याचा राजा व त्याचे अधिकारी यांना नष्ट करीन.” असे परमेश्वराचे सांगणे आहे.