सफन्या 2:1-14 IRVMar - Bible AI

1हे निर्लज्ज राष्ट्रा, तुम्ही सर्वजण गोळा व्हा आणि एकत्र या.

2फर्मान सादर होण्या आधी आणि दिवस भुसासारखा उडून जाईल त्यापूर्वी,

3पृथ्वीवरील सर्व नम्र लोकहो, जे तुम्ही परमेश्वराचे नियम पाळता, ते तुम्ही त्यास शोधा, धार्मिकता शोधा! नम्रता शोधा! नम्र होण्यास शिका.

4गज्जाचा त्याग करण्यात येईल व अष्कलोन ओसाड होईल.

5समुद्राकाठी राहणाऱ्या लोकांस, करेथी राष्ट्राला हाय हाय! परमेश्वर तुमच्याविरुध्द बोलला आहे.

6तेव्हा समुद्राकाठचा प्रांत मेंढपाळासाठी मोकळी राने होतील व मेंढ्यांच्या कळपांसाठी वाडे असलेली कुरणे असा होईल.

7किनाऱ्याचा प्रदेश यहूदाच्या घराण्यातील राहिलेल्यांचा होईल.

8मवाबाने मारलेले टोमणे व अम्मोनाने वापरलेले अपशब्द मी ऐकले आहेत+ मवाबाने मारलेले टोमणे व अम्मोनाने वापरलेले अपशब्द मी ऐकले आहेत यार्देन नदीच्या बाजूला पूर्वेकडे मवाबी आणि अम्मोनी लोक हे यहूदाचे शेजारी होते. ते दोन्ही उत्पत्ती 19:30-38 नुसार अब्राहामाचा भाचा लोट ह्याचे वंशज होते. इस्राएल लोकांच्या बरोबर त्यांचे संबंध सहसा शत्रुत्वाचे होते. *.

9ह्यास्तव सैन्याचा परमेश्वर, इस्राएलाचा प्रभू असे म्हणतो, “मी जिवंत आहे, म्हणून मवाब सदोमासारखा होईल व अम्मोनवासी गमोरा यांसारखे होतील.

10मवाब व अम्मोन यांची अशी स्थिती होण्याचे कारण गर्विष्ठपणा असेल, कारण त्यांनी सैन्याचा परमेश्वर याच्या लोकांस टोमणे मारले व त्यांची थट्टा केली.

11ते लोक परमेश्वरास घाबरतील, कारण तो पृथ्वीवरील त्यांच्या दैवतांची थट्टा करेल, सर्व लोक त्याची उपासना करतील. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी व सर्व राष्ट्रद्विपे त्याची आराधना करतील.

12अहो कूशींनो, तुम्हीही माझ्या तलवारीने मराल.

13नंतर परमेश्वराचा हात उत्तरेकडे हल्ला करेल आणि अश्शूरचा नाश करीन, आणि निनवेला ओसाड व रूक्ष वाळवंट असे करेल.

14तेथे फक्त कळप व राष्ट्रांचे पशू तिच्यामध्ये वसतील, तिच्या खांबांवर घुबडे व पक्षी आपले घरटे करतील,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
div>