1हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक;
2मी संकटात असताना माझ्यापासून तोंड लपवू नकोस.
3कारण माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे,
4माझे हृदय चिरडून गेले आहे आणि मी गवताप्रमाणे कोमेजून गेलो आहे.
5माझ्या सततच्या कण्हण्यामुळे,
6मी अरण्यातल्या घुबडाप्रमाणे झालो आहे.
7मी जागरण करीत आहे;
8माझे शत्रू सर्व दिवस मला टोमणे मारतात;
9मी राख भाकरीप्रमाणे खाल्ली आहे,
10कारण तुझ्या भयंकर क्रोधामुळे,
11माझे दिवस उतरत्या सावलीप्रमाणे झाले आहेत,
12पण हे परमेश्वरा, तू सर्वकाळ राजासनारूढ आहेस,
13तू उठून उभा राहशील आणि सियोनेवर दया करशील.
14कारण तुझे सेवक तिच्या दगडांची आवड धरतात,
15हे परमेश्वरा, राष्ट्रे तुझ्या नावाचा आदर करतील,
16परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल,
17आणखी तो अनाथाच्या प्रार्थनेला प्रतिसाद देईल.
18पुढील पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल,
19कारण परमेश्वराने आपल्या उच्च पवित्रस्थानातून खाली पाहीले आहे.
20तो बंदिवानाचे कण्हणे ऐकेल,
21नंतर सियोनेतील लोक परमेश्वराचे नाव सांगतील,
22जेव्हा परमेश्वराची एकत्र सेवा करण्यासाठी
23त्याने माझी शक्ती जीवनाच्या मध्येच काढून घेतली.
24मी म्हणालो, “हे माझ्या देवा, माझ्या जीवनाच्या मध्येच मला काढून घेऊ नकोस;
25तू प्राचीन काळी पृथ्वीचा पाया घातला;
26ते नाहीसे होईल, पण तू राहशील;
27पण तू सारखाच आहे,