स्तोत्रसंहिता 130:1-8 IRVMar - Bible AI

1हे परमेश्वरा, मी तुला शोकसागरातून आरोळी मारीत आहे.

2हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या वाणीकडे तुझे कान लक्षपूर्वक लागलेले असोत.

3हे परमेश्वरा, तू जर अन्याय लक्षात ठेवशील तर, हे प्रभू, तुझ्यासमोर कोण उभा राहू शकेल?

4पण त्यांनी तुझे भय धरावे, म्हणून तुझ्याजवळ क्षमा आहे.

5मी परमेश्वराची वाट पाहतो, माझा आत्मा वाट पाहतो, आणि त्याच्या वचनावर मी आशा ठेवतो.

6पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.

7हे इस्राएला, परमेश्वरावर आशा ठेव. कारण परमेश्वर दयाळू आहे, आणि त्याच्याजवळ विपुल उद्धार आहे.

8तोच इस्राएलास त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त करीन.

ticle>