स्तोत्रसंहिता 133:1-3 IRVMar - Bible AI

1पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे किती चांगले आणि आनंददायक आहे.

2ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे, त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या बहुमूल्य तेलासारखे आहे.

3सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे; कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.

ticle>