1मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन;
2मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन,
3मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस.
4हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील,
5खरोखर, ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील
6कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो,
7जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस.