1आकाश देवाचा गौरव जाहीर करते,
2दिवस दिवसाशी बोलतो,
3संभाषण नाही, बोललेले शब्दही नाही,
4तरी त्यांचे शब्द सर्व पृथ्वीभर जातात.
5सूर्य नवऱ्या मुलासारखा आपल्या मांडवातून बाहेर येतो.
6सूर्य एक क्षितीजापासून उदय होतो,
7परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते जीवाला पुर्नजीवित करणारे आहे.
8परमेश्वराच्या सूचना खऱ्या आहेत. जे हृदयाला हर्षीत करतात.
9परमेश्वराची भीती शुद्ध आहे, ती सर्वकाळ टिकणारे आहे,
10ते सोन्यापेक्षा ही मौल्यवान आहेत. अती उत्तम सोन्यापेक्षाही ते शुद्ध आहेत.
11होय, त्याकडून तुझ्या सेवकाला चेतावनी मिळते.
12आपल्या स्वत:च्या चुका कोण ओळखू शकतो? माझ्या गुप्त दोषांची मला क्षमा कर.
13तुझ्या सेवकाला जाणूनबुजून केलेल्या पापापासून राख;