1हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे,
2माझे ऐक, त्वरीत मला वाचव,
3कारण तू माझा खडक आणि माझा दुर्ग आहेस,
4त्यांनी गुप्तपणे रचलेल्या सापळ्यातून तू मला उपटून बाहेर काढ.
5मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो,
6जे निरुपयोगी मूर्तींची सेवा करतात, त्यांचा मी तिरस्कार करतो.
7तुझ्या प्रेमदयेमध्ये मी आनंद आणि हर्ष करीन,
8तू मला माझ्या शत्रूंच्या हाती सोपवून दिले नाहीस.
9परमेश्वरा, माझ्यावर दया कर, कारण मी दु:खात आहे.
10कारण माझे आयुष्य दु:खात
11माझ्या शत्रूंमुळे लोक माझा तिरस्कार करतात
12मृत पावलेल्या मनुष्यासारखा मी झालो आहे, ज्याची कोणी आठवण करत नाही.
13कारण पुष्कळांनी केलीली निंदा मी ऐकली आहे,
14परंतु परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे.
15माझे वेळ तुझ्या हातात आहे.
16तुझ्या सेवकावर तुझ्या मुखाचा प्रकाश चमकू दे.
17परमेश्वरा, मला निराश होऊ देऊ नकोस, कारण मी तुला हाक मारतो,
18खोटे बोलणारे ओठ शांत केले जावोत,
19जे तुझा आदर बाळगतात त्यांच्यासाठी तू आपला थोर चांगूलपणा जपून ठेवला आहे,
20त्यांना आपल्या उपस्थितीच्या आश्रयात तू मनुष्याच्या कटापासून लपवशील.
21परमेश्वर धन्यवादित असो!
22मी घाईत म्हणालो,
23अहो सर्व परमेश्वराच्या मागे चालणाऱ्यांनो, त्याच्यावर प्रीती करा.