स्तोत्रसंहिता 35:1-27 IRVMar - Bible AI

1हे परमेश्वरा जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर.

2तुझी मोठी आणि छोटी ढाल घे,

3जे माझ्या पाठीस लागतात त्यांच्याविरुद्ध आपला भाला आणि कुऱ्हाड वापर.

4जे माझ्या जीवाच्या शोधात आहेत, ते लाजवले जावो आणि अप्रतिष्ठीत होवोत.

5ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूशासारखे होवोत

6त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे.

7विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे.

8त्यांच्यावर नाश अकस्मात येऊन गाठो,

9परंतु मी परमेश्वराच्या ठायी आनंदी असेन,

10माझ्या सर्व शक्तीने मी म्हणेन, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे?

11अनितीमान साक्षी उठल्या आहेत;

12माझ्या चांगल्या बद्दल ते मला वाईट परत फेड करतात.

13परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले,

14मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे.

15परंतु मी अडखळलो असता, त्यांनी एकत्र येऊन हर्ष केला.

16आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली.

17परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस?

18मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन.

19माझ्या शत्रूंस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको.

20कारण ते शांतीने बोलत नाही,

21ते आपले मुख माझ्याविरोधात उघडतात,

22हे परमेश्वरा, तू हे पाहिले आहेस? तर शांत राहू नको.

23हे देवा, माझ्या प्रभू, ऊठ, माझ्या न्यायासाठी आणि वादासाठी लढ.

24परमेश्वरा माझ्या देवा, माझे रक्षण कर,

25“आम्हांला हवे होते ते मिळाले,” असे त्यांना आपल्या हृदयात नको बोलू देऊ.

26जे माझ्या वाईटावर उठले आहेत, ते सगळे लज्जीत होवो आणि गोंधळून जावो.

27जे माझ्या इच्छेला समर्थन करतात ते हर्षनाद करोत आणि आनंदी होवोत.

ticle>