1मी तुला हाक मारतो तेव्हा मला उत्तर दे, हे माझ्या न्यायीपणाच्या देवा.
2अहो लोकहो, तुम्ही किती काळ माझी कीर्ती अप्रतिष्ठेत पालटत राहणार?
3परंतु हे जाणा की परमेश्वराने देवभिरूस आपल्या करीता वेगळे केले आहे.
4भीतीने थरथर कापा, परंतु पाप करू नका!
5न्यायीपणाचे यज्ञ अर्पण करा
6बरेच असे म्हणतात, “आम्हांला चांगुलपणा कोण दाखवेल?
7त्यांच्या धनधान्याची आणि द्राक्षरसाची समृध्दी असते,