स्तोत्रसंहिता 5:1-11 IRVMar - Bible AI

1हे परमेश्वरा, माझे बोलणे ऐक.

2माझ्या देवा! माझ्या राजा! माझ्या रडण्याच्या शब्दाकडे कान दे, कारण मी तुझी प्रार्थना करीत आहे.

3परमेश्वरा, सकाळी तू माझे रडणे ऐकशील,

4खचित तू असा देव आहेस, जो वाईटाला संमती देत नाही.

5गर्विष्ठ तुझ्या उपस्थीतीत उभे राहणार नाहीत, दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा तू द्वेष करतो.

6खोट बोलणाऱ्याचा तू सर्वनाश करतोस;

7पण मी तर तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने तुझ्या घरांत प्रवेश करीन,

8हे प्रभू, माझ्या शत्रूंमुळे तू आपल्या न्यायीपणात मला चालव,

9कारण त्यांच्या मुखात काही सत्य नाही,

10देवा, त्यांना अपराधी घोषीत कर,

11परंतु जे सर्व तुझ्यामध्ये आश्रय घेतात ते हर्ष करोत.

icle>