1थोर परमेश्वर देव, बोलला आहे.
2सौंदर्य परिपूर्णता सियोनेमधून
3आमचा देव येईल आणि तो शांत राहणार नाही,
4त्याने वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारली,
5देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा.
6आकाश त्याच्या चांगुलपणाविषयी सांगत असते.
7हे माझ्या लोकांनो, ऐका, आणि मी बोलेन,
8मी तुमच्या होमार्पणाबद्दल तक्रार करीत नाही.
9मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही.
10कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे,
11उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहित आहे
12मी भुकेला असलो तरी तुला बोलणार नाही,
13मी बैलाचे मांस खाणार का?
14देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर,
15तू संकटात असता मला हाक मार,
16देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे?
17कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस,
18तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता.
19तू वाईटाला आपले मुख देतोस,
20तुम्ही बसता आणि आपल्या भावाविरूद्ध बोलता.
21तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प राहिलो.
22तुम्ही लोक देवाला विसरला आहात.