1हे परमेश्वरा, रागाच्या भरात मला शासन करू नकोस,
2हे परमेश्वरा माझ्यावर दया कर, कारण मी अशक्त आहे.
3माझा जीव फार घाबरला आहे.
4हे परमेश्वरा, कडक धोरण सोड, माझ्या जीवाला वाचव!
5कारण मरणात तुझे कोणीही स्मरण करत नाही.
6मी माझ्या कण्हण्याने दमलो आहे.
7शोकामुळे माझे डोळे अंधूक झाले आहेत.
8अहो लोकांनो, जे तुम्ही अन्यायाचे कृत्य करता, माझ्यापासून निघून जा.
9परमेश्वराने माझ्या दयेची याचना ऐकली आहे;