1हे देवा, मला तार;
2मी खोल चिखलात बुडत आहे, तेथे मला उभे राहण्यास ठिकाण नाही;
3माझ्या रडण्याने मी थकलो आहे; माझा घसा कोरडा पडला आहे;
4विनाकारण माझा द्वेष करणारे माझ्या डोक्यावरील केसांपेक्षाही अधिक आहेत;
5हे देवा, तू माझा मूर्खापणा जाणतो,
6हे प्रभू, सेनाधीश परमेश्वरा, जे तुझी प्रतिक्षा करतात, त्यांच्या फजितीला मी कारण होऊ नये.
7कारण तुझ्याकरता मी निंदा सहन केली आहे;
8मी आपल्या बंधूला परका झालो आहे,
9कारण तुझ्या मंदीराविषयीच्या आवेशाने मला खाऊन टाकले आहे,
10जेव्हा मी रडलो आणि उपवास करून माझ्या जिवाला शिक्षा केली+ मी उपवास करून स्वतःला नम्र केले*,
11जेव्हा मी गोणपाट आपले वस्र केले,
12जे नगराच्या वेशीत बसतात;
13पण मी तर हे परमेश्वरा, माझी प्रार्थना तू, स्वीकारशील अशा वेळेला करतो;
14मला चिखलातून बाहेर काढ, आणि त्यामध्ये मला बुडू देऊ नकोस;
15पुराच्या पाण्याने मला पूर्ण झाकून टाकू नकोस,
16हे परमेश्वरा, मला उत्तर दे,
17आपल्या सेवकापासून आपले तोंड लपवू नकोस,
18माझ्या जिवाजवळ ये आणि त्यास खंडून घे;
19तुला माझी निंदा, माझी लाज आणि माझी अप्रतिष्ठा माहित आहे;
20निंदेने माझे हृदय तुटले आहे; मी उदासपणाने भरलो आहे;
21त्यांनी मला खाण्यासाठी विष दिले;
22त्यांचे मेज त्यांच्यापुढे पाश होवोत;
23त्यांचे डोळे आंधळे होवोत यासाठी की, त्यांना काही दिसू नये;
24तू त्यांच्यावर आपला संताप ओत,
25त्यांची ठिकाणे ओसाड पडो;
26कारण ज्याला तू दणका दिला त्याचा ते छळ करतात;
27ते अन्यायानंतर अन्याय करतात त्यांना दोष लाव;
28जीवनाच्या पुस्तकातून त्यांची नावे खोडली जावोत,
29पण मी गरीब आणि दु:खी आहे;
30मी देवाच्या नावाची स्तुती गाणे गाऊन करीन,
31ते बैलापेक्षा, शिंगे असलेल्या,
32लीनांनी हे पाहिले आहे आणि हर्षित झाले;
33कारण परमेश्वर गरजवंताचे ऐकतो
34आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यामध्ये संचार करणारे
35कारण देव सियोनेला तारील आणि यहूदाची नगरे पुन्हा बांधील;