हबक्कूक 3:1-19 IRVMar - Bible AI

1संदेष्टा हबक्कूकची शिगयोनोथावर प्रार्थनाः

2परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली, आणि मी भयभीत झालो.

3तेमानाहून+ एदोम * देव येत आहे, पारान पर्वतावरून पवित्र परमेश्वर येत आहे, सेला.*

4त्याच्या हातातली किरणे प्रकाशासारखी चमकत होते आणि परमेश्वराने तेथे त्याचे सामर्थ्य ठेवले आहे.

5रोगराई त्याच्या मुखासमोरून गेली, आणि मरी त्याच्या पायांजवळून निघते.

6तो उभा राहिला आणि पृथ्वी मापली; त्याने पाहिले आणि राष्ट्रांचा थरकाप झाला.

7कूशानचे तंबू संकटात असलेले मी पाहिले, मिद्यान देशातील कनाती भीतीने कापत होत्या.

8परमेश्वरा, तू नद्यांवर रागावला होतास का? झऱ्यांवर तुझा राग होता का? समुद्रावर तू भडकला होता का? म्हणूनच तू आपल्या घोड्यांवर आणि आपल्या तारणाच्या रथांवर आरुढ झाला होतास काय?

9तू आपले धनुष्य गवसणी बाहेर काढले आहे; तू आपल्या धनुष्यावर बाण चढवला आहे! (सेला).

10पर्वत तुला पाहून वेदनेमध्ये वितळले!

11चंद्र व सूर्य आपल्या जागी स्तब्ध झालेत, त्यांचे तेज लोपले. तुझे बाण सुटत असता त्यांच्या तेजाने, आणि तुझ्या झळकत्या भाल्याच्या चकाकीने ते दूर गेले आहेत!

12तू रागाच्या भरात पृथ्वीवरून चाल केली आणि क्रोधाने राष्ट्रे पायाखाली तुडविलीस.

13तू तुझ्या लोकांच्या तारणासाठी, तुझ्या अभिषिक्ताच्या तारणासाठी पुढे गेलास! तू दुष्टाच्या घराचा माथा छिन्नविछिन्न केला आहे,

14ते प्रचंड वादळाप्रमाणे आम्हास पांगवण्यास आले असता, तू त्यांचेच भाले त्यांच्या सैनिकांच्या डोक्यात भोसकले,

15पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावलेस, त्यामुळे समुद्र घुसळला गेला.

16मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, माझे ओठ आवाजाने कापले! माझी हाडे कुजण्यास सुरूवात झाली आहे, आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे.

17जरी अंजिराच्या झाडांनी फळ दिले नाही आणि द्राक्षवेलींना काही उपज आले नाही,

18तरी मी परमेश्वराठायी आनंद करीन, माझ्या तारणाऱ्या देवाजवळ उल्लास करीन.

19प्रभू परमेश्वर माझे बळ आहे,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
/div>